IIT Goa in Sanguem Dainik Gomantak
गोवा

IIT Goa in Sanguem : आयआयटी सुनावणीला उपजिल्हाधिकारी, पोलिसच गैरहजर

पीडित शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सांतान रॉड्रिगीस यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोलताना केला.

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa in Sanguem : आयआयटी विरोधक शेतकऱ्यांना कितीही त्रास दिला तरी आम्ही आमच्या जमिनी या प्रकल्पासाठी देणार नाही. उलट अधिक तीव्रपणे लढा देऊ, असा निर्धार व्‍यक्त करण्‍यात आला. मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी सर्वांना बोलावण्‍यात आले होते, परंतु उपजिल्हाधिकारी आणि सांगे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही. हीच संधी साधून शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्‍या.

पीडित शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सांतान रॉड्रिगीस यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोलताना केला. सर्व्हे चुकीच्या पद्धतीने करण्‍यात आला आहे. शेतकऱ्यांना नोटिसा न पाठविता, कलम 4 न लावता आपल्या मर्जीनुसार दुसऱ्यांच्या जमिनीत घुसून सर्व्हे केल्याचा आरोपही त्‍यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांसोबतच प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.

144 कलमचा भंग केल्याचे कारण पुढे करून जोसेफ फर्नांडिस, स्वीझल क्रुझ, नंदा मापारी, फिलोमिना डिकॉस्‍टा, शांतू गावकर, कॉस्ताव मास्कारेन्हस, सुकोर डायस या आठ जणांना 107 कलमाखाली समन्स बजावून पुढील सहा महिने कोणत्याही प्रकारे आपल्या भागात शांतता बिघडविणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे. त्‍यावर सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT