Goa Election Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात पोलिस प्रशासन सतर्क

दरम्यान निवडणूक (Goa Election 2022) काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी स्टॅटिक सर्व्हीलेन्स टीम प्रत्येक मतदारसंघात तैनात करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Election: आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आव्हान आयोगासमोर असून, आयोगाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानुसार खबरदारीचे उपायही घेण्यात आले आहेत. गोव्यात मतदानाचे प्रमाण इतरत्र पेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजलेले आहेत. तसेच राजकीय पक्षांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. जी जी मार्गदर्शक तत्त्वे निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) मांडली आहे, त्याचे पालन राजकीय पक्षांना करावे लागते, त्यानुसार प्रत्येक कानाकोपऱ्यात लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदार संघात दोन वेगवेगळे फ्लाईंग स्कॉड नजर ठेवून आहेत. तसेच निवडणुकीच्या काळात धोकादायक असू शकणाऱ्या व्यक्तींची यादीही बनवलेली आहे. संभाव्य धोकादायक ठरू शकणाऱ्या व्यक्तीवर कोणती कारवाई करावी याविषयी निर्णय घेऊन ठेवलेला आहे. धोकादायक व्यक्तींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले जाणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. (Police administration alert in every constituency on the backdrop of elections)

दरम्यान निवडणूक (Goa Election 2022) काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी स्टॅटिक सर्व्हीलेन्स टीम प्रत्येक मतदारसंघात तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला भरारी पथके प्रत्येक मतदारसंघात दोन याप्रमाणे स्थापन केली आहेत. अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात अधिक दक्ष राहून गैरप्रकार रोखण्याचे आवाहन या पथकांना केले आहे. दरम्यान मुरगाव तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई हे निर्वाचन अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांनी आज कुठ्ठाळी मतदार संघातील संवेदनशील भाग म्हणून प्रत्येक निवडणुकीत ओळखला जातो अश्या झुआरी नगर भागात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रेशियास, मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख, तलाठी अनुज सावंत व इतर अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT