Drunk and Drive case Dainik Gomantak
गोवा

Drunk and Drive प्रकरणी कळंगुट येथे पोलीसांची कारवाई

पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या आंध्र प्रदेशातील पर्यटकांवर पोलीसांनी कारवाई केलीय

गोमन्तक डिजिटल टीम

Drunk and Drive बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे, ट्राफिक नियमांचा भंग करणे अशा कारणास्तव गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच गोव्यातील रस्ते वाहतूक सुरक्षित आणि नियमात रहावी म्हणून गोवा पोलीस सतर्क असून नियमबाह्य कृती करणाऱ्यांवर ते कायदेशीर कारवाई करत आहेत.

त्यातच गोव्यात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. काही पर्यटक गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली अक्षरशः धिंगाणा घालतानाही दिसतात. अशा बेशिस्त पर्यटकांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत.

नुकतेच गोव्यातील कळंगुट या ठिकाणी मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी आंध्र प्रदेशातील पर्यटकांना दंड ठोठावला आहे. दरम्यान काल एका घटनेत एक युवक चालत्या चारचाकीच्या बॉनेटवर बसून प्रवास करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सगळ्या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ठरवले आहे.

गोव्यातील वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन आणि सरकार सदैव तत्पर आहे. यासाठी वाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. वाहतूक परवाना, इन्शुरन्स, हेल्मेट या सर्व गोष्टी वाहनचालकांसाठी सक्तीच्या करण्यात आल्या असून, यापैकी कोणतीही गोष्ट नसल्यात चालकांना दंड आकारण्यास सुरुवात देखील केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT