Polem Loliem child assault Dainik Gomantak
गोवा

Polem Loliem: 4 वर्षांच्या बालकाला अमानुष मारहाण, आईच्या अटकेसाठी पोळेवासीय एकवटले; मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

Polem Loliem child assault: मारहाण झालेल्या मुलाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलाचे वडील जया कोलेकर हे विदेशात नोकरी करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: सुपांगुडी-पोळे लोलये येथे अंदाजे ४ वर्षे वयाच्या बेकायदेशीरपणे विकत घेतलेल्या चिमुरड्याला अमानुष मारहाण केल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी त्याच्या आईला अटक करावी, अशी मागणी करत पोळेवासीयांनी पोलिसांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत समाज कार्यकर्ते जनार्दन भंडारी आणि तारा केरकर होत्या.

मारहाण झालेल्या मुलाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलाचे वडील जया कोलेकर हे विदेशात नोकरी करतात. त्याची आई शोभा कोलेकर ही त्याचा सांभाळ करते. चिमुरड्याला अमानुष मारहाण झाल्याची माहिती मिळताच पोळे येथील रहिवाशांनी आई शोभा हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून ताबडतोब तिला अटक करण्यासाठी काणकोण पोलिसांना निवेदन दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला १५ ऑक्टोबरला कांजिण्या आल्या होत्या. त्यानंतर त्याच्या आईने त्याला साखळीला नेले. त्यानंतर ते दोघे काकोड्याला गेले. मध्यंतरीच्या काळात तो मुलगा पडून जखमी होऊन कांजिण्या आलेला फोड फुटला. त्याला कद्रा-कारवार येथून दत्तक घेण्यात आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्व घटनाक्रमासंबंधी चौकशी सुरू असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले.

मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील कोलेकर दाम्पत्याने कारवार येथील एका दलालाकडून ६ लाख रुपये देऊन हा मुलगा विकत घेतला होता. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी कोणतेच कायदेशीर सोपस्कार केलेले नाहीत. त्यामुळे मुलांची विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट सध्या कार्यरत असून त्याचा छडा लावण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिकांनी तारा केरकर यांना घटनास्थळी बोलावून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुलाच्या डोक्यावर, गालावर जखमा

या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर आणि गालावर जखमा झाल्या आहेत. मुलावर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी तारा केरकर यांनी त्याच्या आईला अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोळे येथील स्थानिक रहिवाशांसोबत तारा केरकर, कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT