Canacona: काणकोण तेरेखोल वीर आल्फ्रेड आफान्सो यांचा हातात तिरंगा घेतलेला पूर्णाकृती पुतळा तेरेखोल किल्ल्यावर उभारावा, अशी मागणी पैंगीण पंचायतीने केली आहे.या संदर्भात ६ सप्टेंबरला झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत या सबंधीचा ठराव संमत करण्यात आला आहे.
हा ठराव उपसरपंच सुनील पैंगणकर यांनी मांडून त्याला सरपंच सविता तवडकर यांनी अनुमोदन दिले.१५ ऑगस्ट १९५४ रोजी पैंगीणचे आल्फ्रेड आफोन्सो यांनी तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.
त्यांनंतर त्यांना दुसऱ्या दिवशी अटक करून मारहाण करून तुरूंगात डांबले.त्यानंतर एका वर्षाने म्हणजे १५ ऑगस्ट १९५५ रोजी १४७ सत्याग्रहींची तुकडी तेरेखोल भागातून गोव्यात आली.
सत्याग्रहींवर पोर्तुगीज सैनिकांनी गोळीबार केला त्यात हिरवे गुरूजी व शेषनाथ वाडेकर हुतात्मे झाले. तेरेखोल किल्ल्यावर आल्फ्रेड आफोन्सो व हिरवे गुरूजी तसेच वाडेकर यांचा फलक लावला होता.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
सध्या सरकारने तेरेखोल येथील हुतात्मा फलक हटवून त्याजागी हुतात्मे हिरवे गुरूजी तसेच शेषनाथ वाडेकर यांचे पुतळे उभारण्याचे ठरविले आहे.
या पुतळ्यांबरोबरच तेरेखोलवीर आल्फ्रेड आफोन्सो यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा,अशी मागणी पैंगीण पंचायतीने केली आहे.
या सबंधीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत व पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई व सभापती रमेश तवडकर यांना दिले आहे. व्हॉल्टर यांनी गोवा दमण,दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरूदास कुंदे यांनाही निवेदन दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.