ravindra bhavan margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : भळभळत्या जखमेतूनच जन्माला येते कविता: सौमित्र

Margao News : मडगावात रसिकांनी अनुभवला ‘काव्यानंद’

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : सासष्टी, कवी हा संवेदनशील असावा. आसपासच्या परिस्थितीचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो. कवीच्या मनाची जखम उघडी पडते, तेव्हा त्या भळभळत्या जखमेतूनच कवितेचे शब्द कवीला स्फूरतात अन् कविता जन्मते ,असे अभिनेता तथा कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी ‘काव्यानंद’ कार्यक्रमात मुलाखतीत सांगितले.

कविता तीच चांगली असते जिचे पुष्कळ अर्थ असू शकतात,असेही ते म्हणाले.

श्रेष्ठ कवी स्व. बाकीबाब बोरकर यांच्या जयंती दिनी ३० रोजी ‘काव्यानंद’चा शुभारंभ संगीतकार अशोक पत्की, कवी किशोर कदम यांच्या उपस्थितीत झाला. आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक तसेच काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सौमित्र म्हणाले, जो चांगले गाणे लिहू शकतो तो चांगला कवी पण होऊ शकतो. राजेंद्र तालक यांनी काव्यानंद हा उपक्रम सुरू केला आहे. कवी अमेय नाईक, अंबेश तलवडकर, डॉ. श्यामा सिंगबाळ, संजीव भरणे, आमोद कुलकर्णी, अभय सुराणा यांनी अप्रतिम कविता सादर केल्या. 

दर चौथ्या शुक्रवारी काव्यानंद

रवींद्र भवनाच्या खुल्या जागेतील मिनी मंचावर काव्यानंदचे सादरीकरण महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी होणार आहे. यात नवोदित कवी, कवयित्रींना  आपल्या रचना पेश करण्याची संधी प्राप्त होणार आहे. काव्यानंद बरोबर नाट्यांजली (नाटक, एकपात्री प्रयोग), स्वरांजली (गायन), नृत्यांजली (नृत्य) यातील  कलाकारांनाही खुला मंच खुला असल्याचे राजेंद्र तालक यांनी सांगितले आहे.

संगीतकाराला गाण्याला चाल लावताना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी गाण्याची चाल आधी बनते व नंतर त्यात शब्द घातले जातात. संगीतकारालाही चाल लावताना त्या गाण्याचा अर्थ कळणे गरजेचे असते.

-अशोक पत्की, संगीतकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT