गोमन्त विद्या निकेतन Dainik Gomantak
गोवा

मडगावी विद्यानिकेतनात 196 वी काव्यमैफल संपन्न

गोव्याचो साहित्यिक (Literary Goan) व साहित्यिक संस्था मराठी साहित्य संस्कृतीचे (culture) जतन करण्यासाठी मदत करतात हे प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोमन्त विद्या निकेतनतर्फे प्रा. कविता अशोक बोरकर (Ashok Borkar) संचलीत 196वी बहुभाषिक काव्यमैफल नानीन्यपुर्ण अशा गुगलमीटवरुन मोठ्या उत्साहास संपन्न झाली. मैफलीची सुरुवात कवयित्री वर्षा प्रभूगावकर यानी गायिलेल्या सरस्वती वंदनाने झाली. सुप्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार अशोक नाईक तुयेकर (Naik Tuekar) तथा कवी पुष्पाग्रज यानी मैफलीचे अध्यक्षस्थान भुषविले.

कविता ही आकाशीच्या सौदामिनी सारखी असते. कोरोना (Covid 19 )महामारीत आपण सगळे एकमेकांपासुन दुरावलो. पण या काळात विविध माध्यमातुन आम्ही व्यक्त होण्याची किमया शिकलो असे कवी पुष्पाग्रज यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. कवितेच्या माध्यमातुन स्वताला अभिव्यक्त व्हावस वाटते हे खूप महत्वाचे असेही ते म्हणाले.

मैफलीला प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड येथील साहित्य तथा शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी वक्ते शंकरराव चव्हाण महाविद्यालयात (Shankarrao Chavan College) कार्यरत असलेले डॉ. प्रा. हनुमंत मारोतीराव भोपाळे हजर होते. गोव्याचो साहित्यिक (Literary Goan) व साहित्यिक संस्था मराठी साहित्य संस्कृतीचे जतन करण्यासाठी मदत करतात हे प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

या मैफलीत वर्षा प्रभुगावकर, रजनी रायकर, विशाल नारायण, डॉ. नुतन देव, प्रसाद सावंत, उषा कामत, रजत हेगडे, संतोष तिंबलो, शर्मिला प्रभू, वंदना चौधरी, प्रकाश सपकाळ, विराज प्रभुदेसाई यानी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री पुर्णिमा देसाई यानी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT