Podoshe incident Dainik Gomantak
गोवा

Podshe Gunshot: 'मद्यपींना घाबरवण्यासाठी' गोळीबार! सत्तरीचे गूढ उकलले, आरोपीच्या घरातून Air Gun जप्त

Sattari Podoshe: सत्तरी तालुक्यातील पोडोशे परिसरात सप्टेंबर महिन्यात गूढ वस्तूच्या धडकेत एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली

Akshata Chhatre

Podoshe attack news: सत्तरी तालुक्यातील पोडोशे परिसरात सप्टेंबर महिन्यात गूढ वस्तूच्या धडकेत एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. ही घटना २० सप्टेंबर रोजी घडली असून याप्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाच्या तपासाला आता मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

स्टोअररूम तोडून 'एअर गन' जप्त

घटनेच्या अनुषंगाने, वाळपई पोलीस ठाण्याच्या पथकाने एफएसएल पथकासह मिळून झारीवाडा, पोडोशे येथील हाऊसिंग बोर्ड परिसरात कसून शोधमोहीम राबवली. घर क्रमांक १३१/१३ येथे पोलिसांचे पथक पोहोचले. घरामधील तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, पोलिसांना घराशेजारी एक कुलूपबंद स्टोअररूम दिसली.

पोलिसांनी घरमालक नंदकुमार महादेव आपटे यांना ती उघडण्यास सांगितले असता, त्यांनी नकार दिला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून स्टोअररूमचे कुलूप तोडले आणि तपासणी सुरू केली. स्टोअररूमच्या आत, एका निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये ठेवलेल्या लांब बॅगेत, 'स्कोप' लावलेली एक प्रोफेशनल एअर गन पोलिसांना हस्तगत झाली.

मद्यपींना घाबरवण्यासाठी गोळीबार

आरोपी नंदकुमार आपटे यांच्याकडे या एअर गनचा कोणताही परवाना नव्हता आणि ते तिचा बेकायदेशीररित्या वापर करत होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या कसून चौकशीत नंदकुमार आपटे यांनी दोन्ही गोळीबार घटनांची कबुली दिली आहे.

रात्री उशिरा परिसरामध्ये दारू पिण्यासाठी आणि इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी जे लोक एकत्र जमत होते, त्यांना घाबरवून पळवून लावण्यासाठी आपण एअर गनमधून गोळीबार केला होता, असे त्याने कबूल केले आहे.

कायदेशीर प्रक्रिया सुरू

पोलिसांनी सध्या आरोपी नंदकुमार आपटे यांना कलम ३५(३) नुसार नोटीस बजावली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहेत. या गूढ गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, पुढील तपास वाळपई पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: कठुआमध्ये भारतीय जवानांचा थरार! जैश-ए-मोहम्मदच्या 'उस्मान'चा खात्मा; पाकड्यांचा मोठा कट उधळला

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

SCROLL FOR NEXT