Podoshe: शॉर्टसर्किटसारखा आवाज, गूढ वस्तूच्या धडकेत युवक जखमी; कारापूर-तिस्कमधील घटनेने खळबळ

Sattari Podoshe: सत्तरी तालुक्यातील पोडोशे येथे शनिवारी संध्याकाळी गूढ वस्तूच्या धडकेत एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Sattari Podoshe
Sattari PodosheDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सत्तरी तालुक्यातील पोडोशे येथे शनिवारी संध्याकाळी गूढ वस्तूच्या धडकेत एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही घटना शनिवार, २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कारापूर-तिस्क, श्रीरामनगर येथील चौकाजवळ घडली.

तक्रारदार मोहम्मद अख्तर आलम (वय ३५ वर्षे, रा. पोडोशे) यांनी दिलेल्या तक्रारीत दोन सहकाऱ्यांसह ते एका जागी बसले असता, अचानक विजेच्या शॉर्टसर्किटसारखा मोठा आवाज झाला. त्या दिशेला पाहताच अज्ञात वस्तू त्याच्या मानेला धडकली आणि त्याच्या उजव्या बाजूला गंभीर जखम झाली.

सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याच्या भावाला कळविले. जखमी आलम यांना सुरुवातीला साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविले.

Sattari Podoshe
Old Goa Accident: 3 वर्षांपूर्वी झाला होता अपघात, पादचारी झाला ठार; सबळ पुराव्याअभावी बसचालकाची निर्दोष मुक्तता

आलम यांच्या तक्रारीवरून वाळपई पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२५ व कलम ११८ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे. पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी मोठा आवाज झाल्याचे मान्य केले. मात्र, परिसरात कोणालाही अज्ञात वस्तू फेकताना किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्याचे सांगितले नाही.

Sattari Podoshe
Pernem Accident: पेडणे-न्हंयबाग जंक्शन ठरले मृत्यूचा सापळा; वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांकडूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. जखमी इसमाला लागलेली वस्तू नेमकी कोणती होती आणि ती कुठून आली, याबाबत अजून स्पष्टता नाही. सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com