Court Dainik Gomnatak
गोवा

मातृत्वाचा टाहो की कायदेशीर पेच? बाळाला हिरावून घेतल्याचा आईचा हस्तक्षेप अर्ज कोर्टानं फेटाळला; काय नेमकं प्रकरण?

Biological Mother Intervention Plea Rejected: कर्नाटक पोलिसांनी स्तनपान करणाऱ्या बालकाला आपल्या ताब्यातून जबरदस्तीने हिरावून घेतल्याचा दावा करणाऱ्या जन्मदात्या आईचा हस्तक्षेप अर्ज पणजी येथील जलद गती विशेष न्यायालयाने (पॉक्सो) फेटाळून लावला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कर्नाटक पोलिसांनी स्तनपान करणाऱ्या बालकाला आपल्या ताब्यातून जबरदस्तीने हिरावून घेतल्याचा दावा करणाऱ्या जन्मदात्या आईचा हस्तक्षेप अर्ज पणजी येथील जलद गती विशेष न्यायालयाने (पॉक्सो) फेटाळून लावला आहे. फोंडा येथील ‘मातृछाया’ या विशेष दत्तक संस्थेने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.

दक्षिण गोवा बाल कल्याण समितीने एका बालकाला बेळ्ळारी - कर्नाटक येथील समितीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ‘मातृछाया’ या संस्थेने ‘जुवेनाईल जस्टिस ॲक्ट, २०१५’ च्या कलम १०१ अंतर्गत आव्हान दिले आहे. हे मुख्य अपील अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.

कर्नाटक पोलिसांनी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर नेले आणि बाल कल्याण समितीने आपल्या संमतीशिवाय न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली, असा आरोप आईने केला होता. मूळ आदेश पारित करताना बाल कल्याण समितीने आईला पक्षकार बनवले नव्हते. त्यामुळे अपीलाच्या स्तरावर पहिल्यांदाच तिला या प्रकरणात समाविष्ट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आईचा अर्ज फेटाळला असला, तरी न्यायालयाने बाल कल्याण समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दक्षिण गोवा बाल कल्याण समितीने मुलाला बेळ्ळारी येथे पाठवण्याचे आदेश देताना मुलाच्या हिताचा विचार केला आहे की नाही किंवा त्यामागे काय ठोस कारणे आहेत, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख मूळ आदेशात नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

आईला पर्यायी मार्ग मोकळा

आईचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला असला, तरी न्यायालयाने तिला दिलासा देताना स्पष्ट केले की, ती दक्षिण गोवा बाल कल्याण समितीशी संपर्क साधून आपली बाजू मांडू शकते. या प्रक्रियेत तिला समिती सहकार्य करू शकते, असेही न्यायालयाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT