मडगाव: नवी दिल्ली येथे स्थित पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गोव्याच्या मुख्य सचिवांना फ्लॉइड कुतिन्हो यांच्या तक्रारीची दखल घेण्यास सांगितले आहे. फ्लॉइड कुतिन्हो हे मडगावचे रहिवासी असून त्यांनी कुडतरी पोलिस स्टेशनचे माजी पीआय आणि सध्याचे डीवायएसपी सागर एकोस्कर आणि इतरांविरुद्ध तक्रार केली आहे. (PMO orders interrogation of Curtorim police)
फ्लॉइडने एकोस्कर, तेजसकुमार नाईक, हवालदार धीरज नाईक आणि रिजवान शेख यांच्यासह इतरांविरुद्ध कुतीन्हो यांनी पंतप्रधानांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. यामध्ये नमूद करण्यात आले होते की हे पोलिस (Police) आपला छळ करत आहेत तसेच आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पीएमओचे सेक्शन ऑफिसर आशिष कुमार मिश्रा यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यासाठी पत्र पाठवले आहे. तत्कालीन पीआय आणि सध्याचे डीवायएसपी एकोस्कर यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी असून त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या अधिकाऱ्यांची विनाकारण छळ केल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी कुतिन्हो यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे. त्यांनी निवेदनाच्या प्रती पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, राज्यपाल आणि इतरांना पाठवल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.