गोव्यातील पर्यटन खात्याच्या सुविधा आता ऑनलाईन

रोहन खंवटे: ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचा 34 वा शपथविधी
रोहन खंवटे
रोहन खंवटेDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटन उद्योगातील व्यावसायिकांसाठी येत्या आठवड्याभरात सर्व सुविधा ऑनलाईन केल्या जातील, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी केले.

ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाच्या (टॅग) 34 व्या शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. दोनापावल येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित सोहळ्यास पर्यटन खात्याचे सचिव रवी धवन, टॅगचे नवनिर्वाचित अध्यक्ष नीलेश शाह, माजी अध्यक्ष सविओ मेसायस आणि कार्यकारी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

रोहन खंवटे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

पुढे बोलताना मंत्री खवंटे म्हणाले, राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी सरकार अधिक प्रयत्न करत आहे. या उद्योगातील व्यावसायिकांना यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. विविध प्रकारचे परवाने आणि ना - हरकत दाखले घ्यावे लागत होते. हे सर्व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन करावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता, असे मंत्री खवंटे म्हणाले.

‘टॅग’च्या समस्या सोडवू

टॅग ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मी स्वतः पर्यटन उद्योगात होतो. यामुळे मला या व्यवसायातील अडचणी आणि समस्या माहीत आहेत. टॅगच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलेल्या सर्व समस्या सोडवल्या जातील. तसेच राज्यातील पर्यटन वाढीसाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सरकार त्यांच्यासोबत असेल, अशी ग्वाही मंत्री खवंटे यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com