PM Modi Diwali celebration Goa Dainik Gomantak
गोवा

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

PM Modi Diwali celebration 2025: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत करतील, अशी माहिती समोर आली आहे

Pramod Yadav

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवांनांसोबत दिवाळी साजरी करतात. २०१४ पासून पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींनी ही परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी (२०२५) मोदी गोव्याच्या किनाऱ्यावर तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मोदी जवानांसोबत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उत्सव साजरा करतील.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करताना अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. या दिवाळीला पंतप्रधान मोदी गोव्यात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष मोदी सैनिकांसोबत करतील, अशी माहिती समोर आली आहे.

परंपरा कायम

नरेंद्र मोदी २०१४ झाली पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नेहमीच जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. २०१४ साली त्यांनी लडाख येथील सियाचिनला भेट दिली होती. यानंतर २०१५ साली त्यांनी पंजाबमधील डोगराई येथे भेट देऊन १९६५ च्या युद्धातील हिरोंना मानवंदना दिली होती.

२०१६ – हिमाचल प्रदेशातील सुमडो येथे बीएसएफच्या जवानांना भेट

२०१७ – जम्मू काश्मीरमधील गुरेज भागाला भेट

२०१८ – हरसील – उत्तराखंड येथील इंडो तिबेटीयन सीमेला भेट

२०१९ – राजौरी येथील जवानांना भेट

२०२० – कोरोना काळात मोदी जैसलमेर राजस्थान येथील लोंगोवाला येथे हजर होते.

२०२१ – जम्मू काश्मीर मधील नवशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

२०२२ – कागरिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली दिली.

२०२३ – यावर्षी त्यांनी हिमाचल प्रदेशातील लीपचा येथे आणि २०२४ मध्ये त्यांनी गुजरातमधील सर क्रीक येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

SCROLL FOR NEXT