PM Modi In Goa
PM Modi In Goa Dainik Gomantak
गोवा

PM Modi In Goa: संविधानाबाबत वक्तव्याचा पुन्हा समाचार घेणार? धेपें, भाऊंच्या प्रचारार्थ मोदी शनिवारी गोव्यात

Pramod Yadav

PM Modi In Goa

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी, दि.२७) गोव्यात सभेला संबोधित करतील. सांकवाळ येथे मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बिर्ला मंदिराच्या समोरील खुल्या जागेत सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. मोदींच्या सभेला राज्यभरातून सुमारे ५० हजारपेक्षा जास्त नागरिक हजर राहतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सादानंद तानावडे यांनी दिली आहे.

मोदींच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे, अवाहन सादानंद तानावडे यांनी केले आहे. दक्षिणेतून भाजपने महिला उमेदवार पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली असून, भाजपसाठी ही जागा महत्वाची ठरली आहे. दक्षिणेत २०१९ च्या निवडणुकीत भाजपला फटका बसल्याने यावेळी पक्ष मोठ्या ताकदीने पचारात उतरल्याचे दिसत आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींची होणारी सभा धेंपे तसेच, श्रीपाद नाईक यांच्या प्रचारार्थ निर्यणायक ठरणार आहे. भाजपकडून यासभेच्या तयारीची जबाबदारी माविन गुदिन्हो, कृष्णा साळकर आणि संकल्प आमोणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील गुरुवारी सभास्थळावरील तयारीचा आढावा घेतला.

विरियातोंच्या संविधानाबाबतच्या वक्तव्याचा मोदी पुन्हा समाचार घेणार?

काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यावर संविधान जबरदस्तीने लादल्याचे वक्तव्य केले. यामुळे त्यांच्यावर राज्यासह देशातून टीकेचे झोड उठली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड येथील सभेत या वक्तव्याचा संदर्भ देत, विरियातो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला, अशा शब्दात टीका केली.

दरम्यान, शनिवारी गोव्यात होणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विरियातो यांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का? तसेच, गोव्याला काय आश्वासन देणार, कोणत्या घोषणा करणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

Goa Today's Live News: कोकण रेल्वेचे करमळी येथे लेक व्ह्यू रेस्टॉरंट; मडगावात रेंट बाईक सुविधा

Panaji Corporation : खोदकामांमुळे दोन महिन्‍यांपासून खावी लागतेय धूळ; रायबंदरवासीयांच्‍या नशिबी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

SCROLL FOR NEXT