PM Modi Dainik Gomantak
गोवा

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा सरकारतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या १६ दिवसीय कार्यक्रमामध्ये राज्यभर विविध उपक्रम राबविले जाणार असून त्यातून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रसार-प्रचार, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन, तसेच आत्मनिर्भरतेच्या दिशेने जनजागृती केली जाणार आहे.

सर्व खाते प्रमुखांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सेवा पंधरवडा हा लोकसहभागातून राबविला जाणारा उपक्रम असून विकसित भारत २०४७ या संकल्पनेला गती देणे हेच त्यामागचे उद्दिष्ट आहे.’

हा सेवा पंधरवडा महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू राहणार असून त्याचा समारोप २ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाने होईल. “जनतेच्या सक्रिय सहभागातून हा पंधरवडा यशस्वी होईल आणि विकासाच्या संकल्पनांना गती मिळेल,” असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार : प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, जनधन योजना, उज्ज्वला योजना आदी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

स्वच्छता मोहिमा : गावे, शहरी भाग तसेच शैक्षणिक संस्थांत स्वच्छता मोहीम राबवून ‘स्वच्छ भारत अभियानाला’ बळ मिळवून दिले जाणार आहे.

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन : शाळा, सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात येणार असून, ‘हरित गोवा’ या संकल्पनेला चालना मिळणार आहे.

‘वोकल फॉर लोकल’ अभियान : स्थानिक उत्पादनांचा वापर वाढावा, उद्योजक व स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष मेळावे व प्रदर्शने आयोजित केली जातील.

सेमिनार व कार्यशाळा : ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत विषयांवर सेमिनार, चर्चासत्रे व युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT