PM Modi's direct interaction with Goa volunteers  Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधान मोदी साधणार गोव्यातील जनतेशी संवाद

हा कार्यक्रम सर्व पंचायतींमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांना पाहता यावा यासाठी सोय करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेतून राज्यात गेल्या वर्षभरात लोकांनी लाभ घेतलेल्या योजनांसंदर्भातील आढावा जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) येत्या शनिवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने गोव्‍यातील (Goa) स्‍वयंसेवक आणि जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्व पंचायतींमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांना पाहता यावा यासाठी सोय असेल. ही संकल्पना यशस्वी ठरली असून कृषी, दुग्ध, फलोत्पादन व फुलोत्पादन या क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान मोदी गोव्‍यातील सात जणांशी संवाद साधतील. त्यामध्ये एक सरपंच, एक नगराध्यक्ष, एक स्वयंपूर्ण मित्र तसेच या योजनांचा लाभ घेतलेल्या चार लाभार्थ्यांकडून ते माहिती जाणून घेतील. तसेच काही सूचनाही करतील. 2 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधानांची या अभियानाला प्रारंभ केल्‍यानंतर राज्यातील 191 पंचायतींमध्ये तसेच 14 पालिकांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्ती तर 12 तालुक्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी दर शनिवारी व रविवारी पंचायतींमध्ये हजेरी लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

SCROLL FOR NEXT