Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : श्रीपाद यांना पुन्‍हा केंद्रीय राज्यमंत्रिपद; आयुष मंत्रालय, पर्यटन खाते मिळण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा खासदार बनलेले श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्‍हणून हिंदीतून शपथ घेतली. विशेष म्‍हणजे विजयाची दुहेरी हॅट्‌ट्रिक करणारे मंत्री नाईक हे भाजपच्या प्रत्येक सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत.

शपथविधी सोहळ्‍याला गोव्‍यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री व आमदार, ज्येष्ठ नेते तसेच दक्षिणेतील उमेदवार उद्योजिका पल्लवी धेंपे यांनी उपस्थिती लावून श्रीपाद नाईक यांना शुभेच्छा दिल्या. मोदी मंत्रिमंडळात त्‍यांना आयुष मंत्रालय स्वतंत्र कार्यभार तसेच पर्यटन खाते मिळण्याची शक्यता आहे.

श्रीपाद नाईक हे १९९९ साली पहिल्यांदा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून ते सतत या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही ते केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत. आता पुन्हा एकदा राज्यमंत्री होऊन त्‍यांनी हॅट्‌ट्रिक साधली आहे. आतापर्यंत त्‍यांनी बंदर, जहाजबांधणी, जलमार्ग मंत्रालय, पर्यटन व संस्कृती, आयुष मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. मागील सरकारमध्ये ते आयुषमंत्री तसेच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री होते.

कॅबिनेट मंत्रिपदाचे स्‍वप्‍न अपूर्णच!

लोकसभेतील नाईक यांची कामगिरी साजेशी नसल्याची टीका करणाऱ्यांची बोलती त्यांनी भरघोस मते मिळवून बंद केली. ही आपली शेवटची निवडणूक आहे असे त्यांनी घोषित केले आहे. त्‍यामुळे यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र हे त्‍यांचे स्वप्न पूर्ण झाले नसल्‍याचे काहीसे दुःख त्यांना सलत राहील.

श्रीपाद नाईक (भाजप)

वय : ७१

खासदार : (उत्तर गोवा)

शिक्षण : बी. ए.

कुटुंब : तीन मुलगे.

कोणाला हरवले : ॲड. रमाकांत खलप (काँग्रेस)

मागच्‍या मंत्रिमंडळात : केंद्रीय पर्यटन, जलमार्ग, जहाजोद्योग राज्यमंत्री.

खासियत : राजकीय कारकीर्द सरपंचपदापासून सुरू. नंतर लोकांचा विश्‍‍वास जिंकत सलग सहाव्यांदा जिंकली लोकसभा निवडणूक. पाचव्‍यांदा बनले केंद्रीय मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT