PM Modi  Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi Goa Meeting : सांकवाळातील सभेत विरोधकांचे वाभाडे; ५० हजार लोकांची उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

PM Modi Goa Meeting :

सांकवाळ, काँग्रेसने घोषणा केली आहे की, जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल, ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही.

काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की, तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसूल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे. काँग्रेसचं हे स्वप्न तुम्ही अपूर्ण ठेवायचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांकवाळ येथील जाहीर सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री विश्‍वजीत राणे, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे, खासदार श्रीपाद नाईक, उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासह इतर मंत्री, आमदार, भाजप पदाधिकारी उपस्थित होते. सांकवाळच्या ५० हजार नागरिकांच्या उपस्थित सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ‘आजची ही प्रचारसभा आहे, की विजयीसभा आहे?’ कारण यावेळी प्रचंड घोषणाबाजी, जयजयकार सुरू होता. मोदींनी कोकणीतून भाषणाला सुरवात केली. मोदी म्हणाले, काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की, ते तुमच्या संपत्तीची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील, ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे, हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात.

मोदी म्हणाले, गोव्याशी माझे वेगळे नाते असून माझ्या आयुष्यातील ‘टर्निंग पाॅईंट’ गोव्यातूच घडलेला आहे. माझे भाग्य गोव्यात लिहिले गेले. मी पंतप्रधान झालो, त्यामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी गोव्यातून माझे दोन साथी लोकसभेत पाहिजेत.

...तर पर्रीकरांना आनंद झाला असता

काश्मीरच्या ३७० व्या कलमामुळे तेथे दहशतवादाला प्रोत्साहन मिळत होते. जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपचे सरकार हे कलम जमिनीत गाडू शकले आहे. स्व. मनोहर पर्रीकर आज असते, तर या गोष्टीने त्यांना निश्चितच आनंद झाला असता.

पण इंडी आघाडी, काँग्रेस ३७० कलम पुन्हा हटवणार असल्याचे सांगत आहे. हे जनतेला मान्य आहे का? तुम्ही जनता हा निर्णय मागे घेऊ देणार आहात का? कॉंग्रेस मतांच्या राजकारणासाठी भयानक चाली रचत आहे. कॉंग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ पाहात आहे. ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या हक्काचे आरक्षण ते धर्माच्या नावावर वाटणार आहेत. कर्नाटकात त्याची सुरवातही त्यांनी केली आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

काँग्रेसचा देश, घटनाविरोधी कट

मोदी म्हणाले की, कॉंग्रेस देशात नकारात्मकता पसरवत आहे. कॉंग्रेस तुष्टीकरणासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचा आणि राज्यघटनेचा अपमान करत आहे. याविषयीचा मोठा खुलासा कॉंग्रेसच्या गोव्यातील उमेदवाराने केला आहे.

या खुलाशाने कॉंग्रेसची पोलखोल झाली आहे. मतांच्या राजकारणापुढे त्यांना राज्यघटनेचे महत्त्व नाही, हे दिसून आले आहे. कॉंग्रेसने हा समजून-उमजून केलेला कट आहे. ही केवळ एकच घटना नाही. कर्नाटकातील कॉंग्रेस खासदाराने देशाचे तुकडे करण्याची गोष्ट बोलून दाखविली आहे.

आठ मिनिटे बोलल्या पल्लवी :

भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांना फारसे बोलता येत नाही, अशी टीका केली जाते. त्यामुळे वास्को येथील सभेत त्या काय बोलतील, याची उत्सुकता होती. शनिवारच्या सभेत त्या चक्क आठ मिनिटे बोलल्या. अर्थातच, हे भाषण त्यांना लिहून दिले होते. त्यांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी गोव्यातील दोन्ही भाजप उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.

पंतप्रधानांनी दिल्या सहा गॅरंटी!

७० वर्षांवरील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार

येत्या वर्षात बेघरांना पक्की घरे बांधून देणार

घराघरांत पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा

मच्छीमारांसाठी विमा योजनेतील अर्थसाहाय्यात वाढ

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार

गोव्याला आंतरराष्ट्रीय परिषदांचे केंद्र बनविणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT