IFFI Goa 2023 PIB
गोवा

इफ्फीत मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक, आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारले सेल्फी पॉईंट

इफ्फीच्या काळात सिने-मेला, फिल्म बाझार यासह विविध उपक्रमांची रेलचेल याठिकाणी पाहायला मिळते.

Pramod Yadav

IFFI Goa 2023: गोव्यात सुरु असलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील सिनेमांची मेजवानी सिने रसिकांसाठी खुली झाली आहे. विविध विभागात सुमारे २७० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

इफ्फीच्या काळात सिने-मेला, फिल्म बाझार यासह विविध उपक्रमांची रेलचेल याठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान, यावेळी इफ्फीत मोदी सरकारच्या योजनांचे आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल्फी घेतली. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी, डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप-इंडिया आणि पंतप्रधान उज्वला योजना यासारख्या योजनाचा समावेश आहे.

आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. इफ्फीच्या निमित्ताने येणाऱ्या सिने रसिकांना या ठिकाणी सेल्फी घेता येणार आहे.

IFFI Goa 2023

कला अकादमीत डिजिटल प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यातच आभासी दुनियेतील काही अविष्कार दाखविण्यात आले आहेत. मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी या प्रदर्शनाला भेट दिली आणि तंत्रज्ञानाची माहिती घेऊन ते समजून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bad Roads: '..रस्त्यांची अक्षरशः वाताहात झालीये, गणेशचतुर्थीपूर्वी तरी दुरुस्त करा'! नागरिकाने लिहिले CM सावंत, अधिकाऱ्यांना पत्र

Foreign Tourists Goa: गोव्यातील व्हिसा संपलेल्या विदेशींना शोधणे आव्हान! 234 हद्दपार; गैरप्रकारांच्या वाढल्या तक्रारी

Vote Chori: मतांची चोरी हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा! सरदेसाईंचा घणाघात; BLA आमदारांचे ‘एजन्ट’ असल्याचे केले आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांची आसामी टोपी

Siddhi Naik Case: ..आमच्या मुलीला न्याय द्या! 'सिद्धी नाईक'च्या आईवडिलांचा टाहो; 4 वर्षे तपास अर्पूणच

SCROLL FOR NEXT