पणजी: कालपासून पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) गोवा दौऱ्यावर (Goa Election) आहेत आणि आज त्यांच्या गोवा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. गोव्यातील जनतेशी त्या भेटी गाठी घेत आहे. ममता बॅनर्जी यांनी उत्तर गोव्यातल्या म्हापसा येथे येथील मार्केटमध्ये पदयात्रा करत कोपरा सभा घेतली यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या "गोमंतकीयांचे हित हेच तृणमूल चे उद्दिष्ट असून आपण एकत्र येऊन नवी सकाळ आनुया. पक्षाचे प्रचारक म्हणून काम करतांना कॉंग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला (BJP) अधिक शक्तिशाली बनवले," असं म्हणत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शनिवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आणि गोव्यातील निवडणुकीपूर्वी GOP सोबत युती होण्याची शक्यता नाकारली.
विरोधकांना एकत्र येण्याची गरज ओळखण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचा आरोप बॅनर्जी यांनी आज केला आणि भाजपचा मुकाबला करण्यासाठी आणि भारताची संघीय संरचना मजबूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखित केले.
काँग्रेसमुळे मोदीजी अधिक शक्तिशाली होणार आहेत. कारण काँग्रेस ही भाजपची टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) आहे. कॉंग्रेसची निर्णयक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. देशाला त्रास सहन करावा लागत आहे. आणि कॉंग्रेसच्या अशा वागण्यामुळे भाजपला पुरेशी संधी मिळाली आहे, असे मत दीदींनी व्यक्त केले. गोव्यात तृणमूलच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टी सोबत करार केला असून निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे.
काँग्रेसने आता गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करण्याची ऑफर नाकारली आहे आणि त्यामुळे पक्षाचे प्रमुख श्री सरदेसाई यांना तृणमूलकडे जाण्यास प्रवृत्त केले आहे. "काँग्रेसबद्दल मी चर्चा करणार नाही कारण तो माझा पक्ष नाही. माझा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि लोकांच्या पाठिंब्याने सरकार बनवणे हेच आमचे भाग्य आहे. मी इतर कोणत्याही पक्षाबद्दल बोलणार नाही. भाजपविरुद्ध लढण्याऐवजी काँग्रेसने बंगालमध्ये माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली दुर्दैवाने गोव्यातही असेच होतांना दिसत आहे. आम्हाला प्रादेशिक पक्षांना जागा द्यायच्या आहेत... मला प्रादेशिक पक्ष मजबूत होताना पहायचे आहेत. आणि आम्हाला राज्यांचे संघटन हवे आहे. संघीय रचना मजबूत असली पाहिजे... प्रत्येक राज्य मजबूत असले पाहिजे. आणि जर प्रत्येक राज्य मजबूत असेल तर केंद्रही मजबूत होईल, असे बॅनर्जी म्हणाल्या.
"विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षासोबत मी आणि माझ्या पक्षाने भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सोबत राज्यातील लहान पक्षी विलीन होईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र ते झाले याचा मला आनंदच आहे.
ही भ्रष्ट आणि जातीयवादी राजवट संपवण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. तेव्हा 2022 च्या निवडणुकिंबद्दल गंभीर होऊया. पुढील वर्षी होणाऱ्या 40 सदस्यीय गोवा विधानसभेच्या निवडणुकीकडे उत्सुकतेने लक्ष दिले जाणार आहे असे मत विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.