Goa Olympic Association Dainik Gomantak
गोवा

गोवा क्रिडा प्राधिकरणातर्फे खेळाडूंचा सत्कार

बिलियर्डस व हॅंडबॉल खेळाडूंचा सत्कार गोवा क्रिडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई (V. M. Prabhudesai) यांच्या हस्ते संपन्न झाला.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (Goa Olympic Association) गोवा क्रिडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ऑलिंपिक जागृती कार्यक्रमाअंतर्गत आज मडगावी नगरपालिका बागेत बिलियर्डस व हॅंडबॉल खेळाडूंचा सत्कार गोवा क्रिडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई (V. M. Prabhudesai) यांच्या हस्ते संपन्न झाला. कोविडमुळे (Covid 19) लोक विलगीकरणाचा अवलंब करु लागले मात्र ऑलिंपिक क्रिडा स्पर्धेमुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम म्हणजे ऑलिंपिक जागृती असली तरी लोकांनी क्रिडा क्षेत्राकडे आकर्षित व्हावे व जास्तीत जास्त लोकांनी खेळामध्ये भाग घ्यावा हाच हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

खेळामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची ताकद आहे. त्यामुळे कोरोना किंवा संभावीत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्यासाठी लोकांनी खेळांमध्ये भाग घेऊन तत्पर रहावे असेही प्रभुदेसाई यांनी सांगितले. एखादा गोव्यातील खेळाडू ऑलिंपिकमध्ये खेळण्या लायकिचा व्हावा या साठी राज्यातील क्रिडा संघटनांनी जास्तित जास्त प्रयत्न करणे व खेळाडूंनी 10 ते 15 वर्षे आपण क्रिडा क्षेत्रात प्रगती करणार याची जाणिव व जिद्द बाळगणे गरजेचे असल्याचेही प्रभुदेसाई म्हणाले. या प्रसंगी नेशविन ऑस्कर डिसोझा, निकोलस काजितन डिसोझा , नायजेल सॅम डिसोझा या राष्ट्रीय स्तरावरील बिलियर्डस खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

वेन्सी गोन्साल्विस, परपेच्युअला पिरीस, हेमंत पारोडकर, एश्लेदियात मास्कारेन्हस ग्रासियस व श्रीराम नाईक या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या हॅंडबॉल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गोवा स्नुकर व बिलियप्रसंगी गोवा स्नुकर व बिलियर्डस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मोरजकर, गोवा हॅंडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश महात्मे, सचिव सेल्विनो डिकॉस्ता  हे मान्यवर उपस्थित होते. गोवा स्विमिंग असोसिएशनचे सचिव सुदेश नागवेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तसेच सर्वांचे स्वागत केले व आभार प्रदर्शनही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT