जागतिक पर्यावरणाचा (global environment) दिवसेंदिवस होत असलेला नाश लक्षात घेता वृक्षारोपणाचा कार्यक्रम (Plantation program) नियमीत स्वरूपात होणे आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी गांवोगावच्या पंचायत मंडळांनी प्रयत्न करण्याचे आवाहन शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री विनोद दत्ताराम पालयेंकर (Former Water Resources Minister Vinod Dattaram Palayenkar) यांनी सडयेंत सांगितले.
सडयें पंचायत आयोजित सडयेतील श्री सातेरी देवस्थानच्या आवारात या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सडयेचे सरपंच निलेश वायंगणकर, उप-सरपंच विशाखा गोलतेकर, पंच सदस्य फ्रांन्सिस फर्नाडीस, मार्ना- शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नाडीस, विलीयम फर्नाडीस, स्थानिक आरोग्य केद्राच्या डॉ. श्रुती नार्वेकर तसेच पणजीतील वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या महिन्याभरात दोन हजारांहून अधिक झाडांच्या रोपट्यांचे स्थानिक लोकांना मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पालयेंकर यांनी पुढे बोलतांना दिली. दरम्यान, सातेरी देवस्थानच्या आवारात व्रुक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी सडयें पंचायत आपल्या हाती घेत असल्याचा सरपंच निलेश वायंगणकर यांनी निर्वाळा केला. दरम्यान, वन खात्याचे अधिकारी ए.डी. गांवस यांनी ,सरकारच्या वन खात्यातर्फे राज्यभरातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात विविध प्रकारची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची यावेळी माहिती दिली. पंच सदस्य फ्रांन्सिस डिसौझा यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. एन्थॉनी डिसौझा यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.