Tree Plantation  Dainik Gomantak
गोवा

Tree Plantation ही चळवळ होणे काळाची गरज - कुलगुरू डॉ. मेमन

"वृक्षमित्र" ने एक कोटी वृक्ष लागवडीची मोहीम केली सुरू

दैनिक गोमन्तक

स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट (SFD) ने देशभरातील "वृक्षमित्र" नोंदणीद्वारे एक कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने SFD गोवा युनिटने सोमवारी गोवा विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते.

(Plantation of trees is important say Goa University Vice-Chancellor Dr. Memon)

Tree Plantation

या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरालाल मेनन यांनी केले. यावेळी भारत सरकारचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई, गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही.एस. नाडकर्णी, अधिवक्ता परिषदेचे अ‍ॅड रविराज चोडणकर अभाविप कोंकण प्रदेश उपाध्यक्ष श्री विलास सतरकर विद्यापीठातील डीन, प्राध्यापक , उच्च माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा शिक्षक उपस्थित होते.

संपूर्ण गोव्यातील विविध महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात 600 हून अधिक रोपांची लागवड केली. यावेळी बोलताना गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल मेनन म्हणाले, "समुदायासाठी वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे. वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप मदत करेल."

यावेळी बोलताना अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई म्हणाले की , "या मोहिमेसाठी पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला. आपण सर्वांनी केवळ झाडे लावण्याचीच नव्हे तर त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेऊ या." यावेळी वृक्ष लागवड व संवर्धन शपथ धनश्री मांद्रेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश नाईक यांनी केले तर आभारप्रदर्शन सर्वेश तळवडकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT