तुये,भोमवाडा पाणी समस्येची आमदार आरोलकरांनी केली पाहणी

समस्या सोडवण्याची दिली ग्वाही
 MLA Arolkar
MLA ArolkarDainik Gomantak

गेले काही दिवस तुये, भोमवाडा येथे पाण्याची समस्या आहे. यामूळे स्थानिक नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. यामूळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय योजनेसाठी आमदार जित आरोलकरांनी आज तुये येथील पंप हाऊसला भेट दिली.

( Tuem, MLA Arolkar Inspected Bhomwada water problem )

 MLA Arolkar
MLA Ulhas Tuyekar: भाजपचे काही उमेदवार पक्षाविरोधात काम करतायेत

मिळालेल्या माहितीनुसार तुये भोमवाडा येथील पाण्याच्या समस्येवरुन आमदार जित आरोलकर यांनी तुये येथील पंप हाऊसला भेट देऊन पाहणी केली यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा करुन काय नियोजन करणे आवश्यक आहे. याबाबत सूचना केली.

 MLA Arolkar
...म्हणून पीडब्ल्यूडीची कामे रखडली- मंत्री निलेश काब्राल

यानंतर अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत पाण्याची समस्या सोडवणार असल्याची ग्वाही दिली, शिवाय पंप हाऊस जवळ जे तळे आहे. यातील पाण्याचा वापर गावासाठी करता येईल. यानूसार योग्य ते नियोजन करुन त्यासाठी जलसिंचन खात्या अंतर्गत योजना आखून पाण्याचा वापर करणार असल्याचे आमदार जित आरोलकर यांनी सांगितले आहे.

आमदार आरोलकरांनी याबाबत आश्वासन दिले असले तरी तुये भोमवाडा येथील नागरिकांची समस्या सुटणार की नाही हे केलेल्या उपाययोजनामूळे समस्या सुटली की नाही यावरुन ठरणार आहे.

...म्हणून पीडब्ल्यूडीची कामे रखडली- मंत्री निलेश काब्राल

गेले काही दिवस राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर बरीच चर्चा झाली आहे. पावसाळ्यात उद्भभवणाऱ्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे या समस्यांतून तातडीने नागरिकांची सुटका होणे आवश्यक आहे. ती काही अंशी कमी पडत असल्याने पीडब्ल्यूडीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामूळे पीडब्ल्यूडी मंत्री निलेश काब्राल यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मनुष्यबळाअभावी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागावर ताण येत आहे. खात्यात अभियंत्यांची 50 टक्के पदे रिक्त आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णक्षमेतेने काम करु शकत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com