Global Street food hub in Miramar Goa Dainik Gomantak
गोवा

मिरामार किनारी होणार ‘ग्लोबल स्ट्रीट फूड हब’

स्ट्रीट फूड हबसाठी रचना मागवल्या; उत्कृष्ट रचनाकाराला मिळणार लाखाचे बक्षीस

दैनिक गोमन्तक

पणजी : मिरामार येथे जागतिक दर्जाचा ग्लोबल स्ट्रीट फूड (जेवण) हब तयार करण्याचा सरकारचा विचार असून यासाठी सल्लागारांकडून रचना मागवल्या आहेत.

रचना सादर करण्यासाठी शेवटची मुदत 17 जून आहे, त्यानंतर प्रकल्पाचे मूल्याकंन करण्यासाठी गठित केलेल्या समिती समोर त्यांना हे सादरीकरण करावे लागणार आहे. निवडण्यात येणाऱ्या रचनाकाराला एक लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. इट राईट उपक्रमांतर्गत हा प्रकल्प आण्यात आलेला आहे, अशी माहिती इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटद्वारे देण्यात आली आहे.(Global Street food hub in Miramar)

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मिरामार समुद्रकिनारपट्‍टीचे पद विहारासाठी सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यात फूड हबसाठी तरतूद केलेली असून पिण्याचे पाणी, जैव उपचारात्मक गटर व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, विद्युतीकरण, हात धुण्याची व्यवस्था, अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. स्वच्छ स्ट्रीट फूड हब प्रमाणासाठी या हबचा विचार केला जाईल. तसेच येथील दुकाने ही विविध पाककृतींची असणार आहेत.

एकूण दीड हजार चौमी. क्षेत्रफळ असणार असून 17 दुकानांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दुकानांची वास्तुरचना गोमंतकीय शैलीची असणार आहे. बांधकाम साहित्य पर्यावरणपुरक आणि टिकाऊ असले पाहिजे. पाककृतीनुसार दुकानांची रचना केली जाईल. सीआरझेड नियमांचे पालन व्हावे. रचनेत कचरा व्यवस्था, हात धुण्याची सुविधा, पाण्याची आणि खाण्याच्या दुकानात आवश्‍यक सर्व सुविधा असणे अनिवार्य आहे.

खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी जागा स्‍टेनलेस स्टीलची असावी. शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ ठेवण्याची स्वतंत्र सोय हवी. तसेच सहजपणे साफ सफाई करता येईल, अशी रचना असेल. ही छोटी दुकाने किंवा खाण्याचे स्टॉल हे अचल असणार आहेत. परंतु, ते कायमस्वरुपी नसतील. प्रसंगी तोडता येईल, अशी त्यांची रचना असेल. या सर्व गोष्टी अनिवार्य असल्याचे स्मार्ट सिटीने स्पष्ट केले आहे.

17 जूनची मुदत

मिरामार येथे येणाऱ्या स्ट्रीट फूड हब हा जागतिक दर्जाचा असेल. त्यासाठी पात्र सल्लागारांकडून रचना मागवण्यात आल्या आहेत. रचना सादर करण्याची 17 जून अंतिम मुदत आहे. रचना निवडण्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या पक्षाकडून यासंदर्भात सल्ला घेतला जाईल, असे पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दै.गोमंतकला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT