Check what's allowed what's not in Goa Unsplash/Dainik Gomantak
गोवा

Travelling to Goa? वाचा काय आहेत नवीन नियम

जर तुम्ही गोव्याला जायचा (Travelling to Goa) विचार करत असाल तर थांबा! वाचा गोव्यात काय चालू काय बंद (Goa: What's allowed what's not)

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही गोव्याला जायचा (Travelling to Goa) विचार करत असाल तर थांबा! गोव्याच्या संचारबंदीत (Goa Curfew) अजून सात दिवसांची वाढ झाली आहे. होय. राज्य सरकारने सततच्या कोरोना रुग्णात वाढ होत असल्याने हा निर्णय घेतला आहे.

गोव्यात कर्फ्यू (Goa Curfew) लागू असूनही कोविड-19 (Covid-19) च्या मार्गदर्शक सूचनांचे गेल्या काही दिवसांपासून सतत उल्लंघन होत असल्याचा चित्र पाहायला मिळत होतं.

गणेशचतुर्थीला (Ganesh Chaturthi 2021) अवघे काही दिवस राहिले असले तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यव्यापी कर्फ्यू येत्या 13 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण गोव्यात लागू असेल तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आदेश कायम ठेवले आहेत. जर तुम्ही गोव्याला जायचं नियोजन करत असाल तर वाचा ही नवीन नियमावली

गोव्यात काय चालू काय बंद (Goa: What's allowed what's not)

· कसिनो, वॉटर पार्क, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क बंद राहतील.

· गोव्यातील क्रुझ देखील बंद राहणार.

· स्पा आणि मसाज पार्लरला देखील बंदी कायम.

· चित्रपटगृहे 50 टक्क्यांच्या क्षमतेनुसार चालू राहतील.

· गोव्यातील शाळा बंद राहतील मात्र स्पर्धा परीक्षांना परवानगी असेल.

· सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, विवाह कार्ये आणि इतर कार्यक्रम यांना 50% पेक्षा जास्त उपस्थिती प्रतिबंधित.

· बार आणि रेस्टॉरंट यांना सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत परवानगी (50 टक्के बसण्याची क्षमता)

· क्रीडा संकुल प्रेक्षकांशिवाय खुले राहतील.

गोव्यात रविवारी 72 नवीन रुग्णांची नोंद झाली. या बरोबरच गेल्या २४ तासात ५ रुग्णांनी आपले जीव देखील गमावले. गोव्यात आत्तापर्यंत 1,74,419 रुग्णांची नोंद झाली असून राज्यात मृतांची संख्या 3,208 वर पोहचली आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधित 900 रुग्ण सक्रिय आहेत, त्यातील 70 जण हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत तर 8 रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू), तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

निर्बंध पाळून गणेश चतुर्थी साजरी करा

गणेशोत्सवाला अवघे 4 दिवस राहिले असताना राज्य सरकारनी कर्फ्यूत वाढ केली. गणेश चतुर्थी साजरा करताना सर्वांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. कर्फ्यू काळात गोव्यातील लोकांनी चांगली साथ दिली असून यापुढेही ती द्यावी, असे ही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT