Placid Dcosta Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अखेर डिकॉस्टाला 'मोपा' वर अटक; पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी नऊ वर्षांपासून होता फरार

Placid Dcosta Arrested: पोलिसाला शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी प्लॅसिड डिकॉस्टा या संशयिताला अटक केली आली आहे. 2015 मध्ये ही घटना घडली होती.

Manish Jadhav

वास्को: पोलिसाला शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी प्लॅसिड डिकॉस्टा या संशयिताला अटक केली आली आहे. 2015 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना संशयित युकेला रवाना झाला होता.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये वेर्णा येथे महाराजा हॉटेलजवळ एक अपघात घडला तेव्हा संशयित डिकोस्टा याने तक्रारदार आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. तसेच, त्यांना मारहाणही केली होती.

लुक आउट नोटीस जारी

दरम्यान, हवालदार मुजावेद खान यांनी या विरोधात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी 2016 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. मडगाव न्यायालयात हा खटला चालू होता. सुनावणीवेळी संशयित उपस्थित न राहिल्यामुळे त्याच्याविरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. 3 नोव्हेंबर रोजी संशयित युकेवरुन गोव्यात प्रवास करत असता मोपा विमानतळावर उतरल्यानंतर या विमानतळावरील इमिग्रेशन चेकपोस्टवर पोलिसांनी डिकॉस्टा याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास वेर्णा पोलिस करीत आहेत.

इटालियन नागरिकाला अटक

दुसरीकडे, प्रतिबंधित जीपीएस उपकरणे बाळगल्याप्रकरणी इटालियन नागरिकाला दाबोळी विमानतळावर अटक करण्यात आली. गिकामो दी फेरारी (इटली) असे या विदेशी नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून जीपीएस डिव्हाईस जप्त करण्यात आले. संशयित प्रवासी चेन्नईला व तेथून कोलंबो येथे जाणार होता. मात्र, जीपीएस यंत्र जप्त करुन विमानतळ सुरक्षा यंत्रणेकडून तत्काळ कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक पोलिसांचा सहभाग होता. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, डी फेरारीकडे हे उपकरण सोबत नेण्यासाठी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या परवानग्या नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

Dudhsagar Tourism: 'दूधसागर'ला पर्यटकांचा गोंधळ! तोबा गर्दीमुळे जीप पडल्या अपुऱ्या; संख्या वाढवण्याची मागणी

Leopard In Goa: सत्तरीत बिबट्याचा थरार! घराच्या अंगणात वाढला संचार; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Tuyem: तुयेत इस्पितळ सुरू करण्यासाठी जनजागृती! प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी समिती आग्रही

Old Goa: बेकायदेशीर घरे पाहणीला गेल्यावर सापडली दोन जुनी बांधकामे! जुन्या गोव्यातील विचित्र प्रकार; सखोल तपासाची मागणी

SCROLL FOR NEXT