Electricity Issue Gomantak Digital Team
गोवा

Pissurlem Electric Issue: भुईपाल भागात बत्ती गूल; लोक त्रस्त

52 कोटींचा प्रस्ताव पडून : अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकारी हतबल

गोमन्तक डिजिटल टीम

Pissurlem Electric Issue: पर्ये मतदार संघात येणाऱ्या भुईपाल, सालेली, पिसुर्ले, कुभांरखण या भागात गेल्या दोन महिन्यांपासून खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून, वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

तर दुसऱ्या बाजूने या सत्तरी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या नियोजनासाठी सुमारे 52 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सरकारकडे पडून आहे,अशी माहिती वीज खात्याचे सहाय्यक अभियंते गावस यांनी दिली आहे.

सत्तरीतील दोन्ही मतदारसंघात वाळपई येथील वीज केंद्रामधून वीज वितरण करण्यात येत आहे, या ठिकाणी पाळी व आमोणा येथील प्रमुख वीज वितरण केंद्रातर्फे वीज पुरवठ्याचे कार्य सुरू आहे.

तरीही पाऊस सुरू झाल्यापासून भुईपाल तसेच इतर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात वीज खात्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

सरकारने काही वर्षांपूर्वी या भागात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ब्रंच केबल घालूनही असे प्रकार घडत असल्याने लोकांनी आश्चर्य वाटते, असे मत भिरोंडाचे सरपंच उदयसिंह राणे यांनी व्यक्त केले.

भुईपाल परिसरातच नव्हे तर संपूर्ण सत्तरी तालुक्यात वीज समस्या आहे. चाळीस वर्षांपूर्वी घातलेल्या वीज वाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत.

त्यात संपूर्ण भाग जंगलमय असल्याने वीज तारा तुटणे, खांब पडणे हे प्रकार घडत असतात, त्यात मनुष्यबळही कमी आहे, तरी पण तारेवरची कसरत करून विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज खात्याचे अधिकारी, तसेच कर्मचारी वर्ग झटत आहेत.

-गावस, सहाय्यक अभियंता वाळपई वीज केंद्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT