Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : जलवाहिनी फुटल्‍याने कोलवाळ गावात दोन दिवस नळ कोरडे

दुरुस्‍तीची मागणी : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : थिवी येथे भूमिगत वीजवाहिन्या टाकताना जलवाहिनी फुटल्‍याने सध्या कोलवाळ गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मागील दोन दिवस पाणी नसल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. लवकरात लवकर जलवाहिनी दुरुस्त करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी साबांखाकडे केली आहे. अन्‍यथा रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्‍याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सध्या वीज खात्यातर्फे थिवी वीजकेंद्र ते पेडणेपर्यंत ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिन्या नेण्याचे काम सुरू आहे. या खोदकामावेळी थिवी येथे दूरध्वनी एक्सचेंज केंद्रानजीक कोलवाळ गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी जलवाहिनी फुटली. तेथे भूमिगत जलवाहिनी असल्याची पूर्वकल्पना कंत्राटदाराला देण्यात आली होती. तरीसुद्धा हा प्रकार घडलाच. कंत्राटदाराचा निष्‍काळजीपणाच या गोष्‍टीस कारणीभूत आहे. त्‍यामुळे लोकांनी संताप व्‍यक्त केला आहे.

सदर जलवाहिनी ८ जुलै रोजी फुटली, मात्र दोन दिवसांनंतर काल सोमवारी दि. १० रोजी फुटलेल्‍या जलवाहिनीचे स्थान शोधून काढले गेले. सदर जलवाहिनी जुनी असल्यामुळे तिला जोडण्यासाठी दुसरी जलवाहिनी उपलब्ध नाही. परिणामी, दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

Bandora: ..झळाळती कोटी ज्योती या!बांदोड्यात गरजू कुटुंबाचे घर उजळले; सोलर पॅनलचा केला वापर

"आमच्या ओठी कोकणी, अन्‌ पोटात मराठी"! खासदार तानावडेंचे प्रतिपादन; 21 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

Navelim: नावेलीत 'जमीन सर्वेक्षणा'चा वाद पेटला, 'सीसीटीव्ही'वरूनही खडाजंगी; पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

Goa Politics: खरी कुजबुज; कॉंग्रेस आमदारांचे ‘पोस्ट लंच'' उपोषण

SCROLL FOR NEXT