Water Pipeline burst in Karaswada Dainik Gomantak
गोवा

Goa : करासवाडा येथे जलवाहिनी फुटली

केबल कामामुळे घटना; 350 एमएम जलवाहिनी खराब

गोमन्तक डिजिटल टीम

Goa : करासवाडा येथे अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी 1000 एमएमची मुख्य जलवाहिनी भूमिगत वीज केबल टाकण्याच्या कामामुळे फुटली. ही जलवाहिनी म्हापसा, पर्वरी, कोलवाळ आणि तालुक्यातील इतर भागांत पाणीपुरवठा करते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी म्हापसा येथे सुरू असलेल्या भूमिगत वीज केबल टाकण्याच्या कामामुळे 350 एमएम जलवाहिनी खराब झाली. या बिघडलेल्या जलवाहिनीची दखल घेत जल विभागाने कारवाई केली आणि 350 एमएम वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यावेळी समजले की, 1000 एमएम जलवाहिनी देखील खराब झाली आहे. कारण, दोन्ही जलवाहिन्या या एकमेकांच्या अगदी जवळ आहेत.

पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. साबांखाच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी सांगितले की, आम्ही नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे.

बार्देश, डिचोलीत मर्यादित पाणी

करासवाडा येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने तिची दुरुस्ती करण्यात येत असून या प्रकारामुळे 24 ऑगस्ट व 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्याच्या काही भागांना मर्यादित पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT