Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tradition : पिळगावात कळसोत्सव उत्साहात; शेकडो वर्षांची परंपरा

Goa Tradition : क्तगणांचेे होमकुंडातून अग्निदिव्य : घरोघरी कलश पूजन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tradition :

डिचोली, अग्निदिव्य आदी पारंपरिक कार्यक्रम आणि शेकडो भक्तगणांच्या साक्षीत पिळगावची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक कळसोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला.

सलग तीन दिवस साजरा करण्यात आलेल्या कळसोत्सवाची आज (शुक्रवारी) पहाटे सांगता झाली.

पिळगाव येथील कळसोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी कळसोत्सवाला प्रारंभ झाला होता. तीन दिवस श्री देवी शांतादुर्गेचा कळस घरोघरी नेण्यात आला. गावकर मंडळी कळस घेऊन ग्रामस्थांच्या घरात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कळसाचे विधिवत पूजन आदी सेवा करण्यात आली. सुवासिनींतर्फे देवीची ओटी भरण्यात आली.

पूर्वीच्या काळी गुढी पाडव्याच्या दिवशीच हा कळसोत्सव साजरा करण्यात येत असे. मात्र, लोकवस्ती वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येत आहे.

गुरुवारी (ता. ११) गिमोणे येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिर, पांडवकालीन चंद्र-सूर्य प्रतिमा कोरलेल्या पाषाणावर विधिवत पूजन झाल्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक वाटेने कलशाचे मंदिराकडे आगमन झाले. कळसोत्सवानिमित्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

भाविकांनी अनुभवला अग्निदिव्याचा थरार

मध्यरात्री एक वाजता पारंपरिक पद्धतीने होमकुंड पेटविण्यात आले. नंतर व्रतस्थ धोंड, भक्तगण पवित्र तळीवर शुचिर्भूत होऊन आल्यानंतर मध्यरात्री तीन वाजता होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला.

''श्री शांतादुर्गा माता की जय'', ''पुंडलिक वर दे हरी विठ्ठल'' आदी जयघोष करीत भक्तगणांसह कलशधारी अवसारी मोडाने नाचत अग्निदिव्य केले. पहाटे पारंपरिक पद्धतीने कौलोत्सव होऊन या उत्सवाची सांगता झाली. अग्निदिव्याची अनुभूती घेण्यासाठी होमकुंडस्थळी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू,भाजपकडे अधिक खासदार; पण विरोधकांना 'क्रॉस व्होटिंग'ची आशा

Goa Opinion: दखल घेतली जात नसेल तर 'न्यायसंस्थांचा' उपयोग तो काय?

Junta House: 1960 सालातील गोव्यातील सर्वात उंच इमारत! 'जुन्ता हाऊस'... सिर्फ नाम ही काफी है

डोकं चालवा 50,000 जिंका! AI आणि APP निर्मितीत तुम्ही मास्टर असाल तर गोवा पोलिस घेऊन आलंय मोठी स्पर्धा; लगेच सहभाग नोंदवा

Mardol: 'जायांचा सुगंध, दिव्यत्व म्हणजे देवीचा प्रसाद'! श्री महालसा देवीची महापूजा

SCROLL FOR NEXT