Goa Film City Project
Goa Film City Project Dainik Gomantak

Goa Film City Project : लोलयेत ‘फिल्म सिटी’ला थारा देऊ नका; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

Goa Film City Project : काणकोणकरांना आपत्तीपासून वाचवा, काँग्रेसचे आवाहन

Goa Film City Project

मडगाव, भविष्यात जन्माला येणाऱ्या काणकोणकरांना आपत्तीपासून वाचवणे आता काणकोणकरांच्याच हातात आहे.

मी काणकोणकरांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी लोलयें येथील पर्यावरण-संवेदनशील भगवती पठारावरील फिल्मसिटी प्रकल्पासाठी संमती देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

काँग्रेसचे ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष आबेल बोर्जेस आदींच्या उपस्थितीत काणकोण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Goa Film City Project
South Goa Loksabha: पारंपरिक मतांवर काँग्रेसचा भरवसा; दक्षिण गोव्यामध्ये वाढली चुरस

आता मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) अखत्यारीत असलेल्या १०५ किमी च्या किनारपट्टीवर राहणाऱ्या गोमंतकीय पारंपरिक व्यावसायिकांना लवकरच अडचणींचा सामना करावा लागेल.

‘एमपीए’च्या अखत्यारीतून संपूर्ण किनारपट्टी मुक्त करण्यासाठी आणि गोमंतकीयांना दिलासा देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. काणकोणातील मच्छीमार समुदाय तसेच किनारपट्टी भागात राहणाऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

आमदार एल्टन डिकोस्टा, सावियो डिसिल्वा,आबेल बोर्जेस यांनी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना मतदान करण्याची विनंती केली. या बैठकीला पैंगीण, आगोंदा, श्रीस्थळ, गावडोंगरी या पंचायत क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com