Vedanta Mining Truck Dainik Gomantak
गोवा

Pilgao: पिळगावात तणाव! ट्रकने दिली स्कूटरचालकाला धडक; ग्रामस्थांनी रोखली 'वेदांता'ची वाहतूक

Vedanta Mining Dispute: खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकाच्या धडकेतून एक स्थानिक स्कूटरचालक बचावल्यानंतर पिळगावात तणाव निर्माण झाला. पिळगावच्या लोकांनी अचानक आक्रमक पवित्रा घेताना ‘वेदांता’ची खनिज वाहतूक रोखून धरली.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Locals Block Vedanta Mining Truck

डिचोली: खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकाच्या धडकेतून एक स्थानिक स्कूटरचालक बचावल्यानंतर आज (बुधवारी) पिळगावात तणाव निर्माण झाला. आधीच नियमबाह्य आणि अनिर्बंधीत खनिज वाहतुकीमुळे त्रस्त बनलेल्या पिळगावच्या लोकांनी अचानक आक्रमक पवित्रा घेताना आज दुपारी सारमानस-पिळगाव जंक्शनवर ‘वेदांता’ची खनिज वाहतूक रोखून धरली.

दोन तासाहून अधिक वेळ खनिज वाहतूक रोखून धरल्याने दोन्ही बाजूने ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या. ‘वेदांता’ अधिकाऱ्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक निर्णयाशी ठाम राहिले. अखेर यापुढे ‘एसओपी’ पाळून खनिज वाहतूक करण्याची ग्वाही ‘वेदांता’ च्या अधिकाऱ्यांनी देताच, २ वा.अडवलेले ट्रक साडेचार वाजता सोडण्यात आले.

२२ दिवसात दुसऱ्यांदा ट्रक अडवले

डिचोलीतील खाणीवरून पिळगावमार्गे सारमानस जेटीपर्यंत होणाऱ्या खनिज वाहतुकीचा मुद्दा गेल्या महिन्यात (ता. २०) झालेल्या पिळगावच्या ग्रामसभेत तापला होता. खनिज वाहतूक करताना नियम पाळण्यात येत नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. खनिज रस्त्यावर सांडत असल्याने सारमानस रस्त्यावर धूळ प्रदूषण आणि चिखलाची दलदल निर्माण होत आहे. असा ग्रामस्थांनी दावा केला होता.

त्यानंतर लगेचच २२ ऑक्टोबर रोजी लोकांनी रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखून धरली होती. ''एसओपी''चे उल्लंघन करुन आणि बेदरकारपणे खनिज वाहतूक झाल्यास खनिज वाहतूक पुन्हा रोखून धरण्यात येईल. असा इशारा त्यावेळी लोकांनी दीला होता.

स्कूटरचालक थोडक्यात बचावला

यासंबंधीची माहिती अशी, की पिळगाव येथील स्कूटरचालक सारमानस-पिळगाव जंक्शनवर पोचला असता, सारमानस जेटीवरून येणारा एक खनिजवाहू ट्रक अचानक मध्येच आल्याने अपघात होता-होता टळला. त्यामुळे स्थानिक स्कूटरचालक थोडक्यात बचावला. त्यानंतर स्कूटर चालकाने स्कूटर मध्येच रस्त्यावर उभी केल्याने खनिज वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. हळूहळू स्थानिक जमले. पिळगाव सरपंच मोहिनी जल्मी यांच्या नेतृत्वात संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून सारमानस-पिळगाव जंक्शनवर खनिज वाहू ट्रक रोखून धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT