Old Goa Pilar Road
Old Goa Pilar Road Dainik Gomantak

Saint Francis Xavier Exposition: सोहळा तोंडावर, पण रस्त्याची दुरावस्थाच! जुने गोवे-पिलार मार्गावर खड्ड्यांचं 'प्रदर्शन'

Old Goa Pilar Road: जुने गोवे-पिलार हा मुख्य जिल्हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. दक्षिण गोव्यातून येणाऱ्या भाविकांसाठी हा शॉर्टकट असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक होते.
Published on

Old Goa Pilar Road Bad Condition

तिसवाडी: २१ नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा पवित्र शवप्रदर्शन सोहळा सुरू होणार आहे. जुने गोवे आणि सभोवतीच्या परिसरातील रस्ते, साधनसुविधांचे काम सुरू झाले असली तरी जुने गोवे-पिलार हा मुख्य जिल्हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. दक्षिण गोव्यातून येणाऱ्या भाविकांसाठी हा शॉर्टकट असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक होते.

करमळी, आजोशी, मंडूर, नेवरा हे गाव रस्त्याच्या दरम्यान असल्याने येथे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मुख्य म्हणजे गेल्या वर्षभरापासून हे खड्डे माती, दगड आणि आता सिमेंट घालून बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही.

Old Goa Pilar Road
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

निदान सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शवप्रदर्शनासाठी हा रस्ता दुरुस्त केला जाईल, अशी आशा लोकांना होती. मात्र, सध्या तरी ती फोल ठरल्याचे दिसते, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे.

सरकार केवळ घोषणा करण्यापुरते मर्यादित असल्याचे दिसते; कारण शवप्रदर्शन सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक राहिला असून साधनसुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातील, अशा मोठ्या घोषणा दिल्या होत्या. परंतु काहीही पूर्ण झाल्याचे दिसत नाही. जुने गोवे-पिलार हा महत्त्वाचा रस्ता असून या सगळ्या व्यवहारातून मुख्यमंत्र्यांनी लोकांना गृहीत धरल्याची प्रचीती येते.

समील वळवईकर, संयोजक, टीएमसी

शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून १७ नोव्हेंबर रोजीपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती दिली जात आहे. जुने गोवे-पिलार रस्ता दक्षिण गोव्यातील भाविकांसाठी महत्त्वाचा आहे, त्याशिवाय शिरदोन, गोवा वेल्हा, पिलार, आगशी लोकांसाठी हाच रस्ता आहे. सरकारने युद्धपातळीवर दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले पाहिजे.

ग्लेन काब्राल, काँग्रेस नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com