Pilgao mining issue Dainik Gomantak
गोवा

Pilgao Mining: ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरळीत! प्रस्ताव अमान्य, पिळगावातील शेतकऱ्यांना फेरविचार करण्याचा सल्ला

Bicholim Pilgao Mining Transport: पिळगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय तूर्त स्थगित ठेवला असून ''वेदांता''च्या डिचोलीतील खाणीवरून खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

Sameer Panditrao

डिचोली: पिळगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय तूर्त स्थगित ठेवला असून ''वेदांता''च्या डिचोलीतील खाणीवरून खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मागणीसंदर्भात बुधवारपर्यंत तोडगा निघाला नाही, तर गुरुवारपासून आंदोलन करण्याचा इशारा पिळगावच्या शेतकऱ्यांनी दिला होता.

दरम्यान बुधवारी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेली शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसंदर्भात केलेली मागणी कायद्याला धरून नाही, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी या मागणीसंदर्भात फेरविचार करावा, असा सल्ला दिला. दरम्यान, ''वेदांता'' कंपनीला शेतकऱ्यांची काळजी असून शेतकऱ्यांनी सामंजस्यपणा दाखवावा, असे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.

कालच्या बैठकीस कंपनीचे अधिकारी उपस्थित नव्हते, मात्र कंपनीने आपले म्हणणे अगोदरच उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले आहे, अशी माहिती मिळाली आहे. एकतर भक्कम नुकसान भरपाई द्या, अन्यथा आमची शेतजमीन आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पिळगावमधील शेतकरी गेल्या सोमवारी अचानक रस्त्यावर उतरले होते.

या शेतकऱ्यांनी जवळपास चार तास ''वेदांता''च्या सारमानस गेटीवर खनिज वाहतूक रोखून धरली होती. नंतर डिचोलीचे संयुक्त मामलेदार माजिक यांनी याप्रकरणी शिष्टाई केली. त्यांनी निश्चित केल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी खोर्जुवेकर यांनी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसंदर्भातचा दावा मान्य केला नाही. उलट चार दिवसांत भूमिका स्पष्ट करा, अशी सूचना केली. मिळालेल्या प्रति चौरस ५,७०० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई द्या, असा शेतकऱ्यांचा प्रस्ताव असल्याचे समजते.

सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्न, कंपनीचा दावा

मध्यंतरीचा बंदीकाळ सोडल्यास गेल्या चार दशकाहून अधिक काळापासून डिचोलीत 'खनिज' व्यवसाय सुरळीतपणे चालत आला आहे. देवस्थान आणि अन्य कुळांच्या जमिनी कायद्यानुसार करार करून कंपनीने ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनी कायदेशीररीत्या ताब्यात आहेत, असा दावा 'वेदांता' (सेसा) कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. शेतकऱ्यांची मागणी अवाजवी आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे. राज्याच्या महसुलाचा आर्थिक कणा असलेला खनिज व्यवसाय सुरळीतपणे होण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे. शेतकऱ्यांनी सामंजस्यपणा दाखवावा, असे आवाहनही कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT