Pilgao Mining Issue: पिळगावात खनिज वाहतूक रोखली, शेतकरी रस्त्यावर; बुधवारपर्यंत तोडग्याची ग्वाही

Goa mining News: एकतर भक्कम नुकसान भरपाई ह्या, अन्यथा आमची शेतजमीन आम्हांला परत द्या, अशी मागणी करीत पिळगावमधील शेतकरी सोमवारी अचानक रस्त्यावर उत्तरले

डिचोली: एकतर भक्कम नुकसान भरपाई ह्या, अन्यथा आमची शेतजमीन आम्हांला परत द्या, अशी मागणी करीत पिळगावमधील शेतकरी सोमवारी (दि.२१) अचानक रस्त्यावर उत्तरले. या शेतकऱ्यांनी 'वेदांता'च्या सारमानस गेटवर खनिज वाहतूक रोखली, खनिज वाहतूक करणारे बहुतेक सर्व ट्रक शेतकऱ्यांनी रोखून धरले.

शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात सुवर्णमध्य काढण्याची ग्वाही मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. त्यामुळे दुपारी खनिज वाहतूक सुरू झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सुमारे चार तास वेदांताची खनिज वाहतूक ठप्प झाली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी सारमानस येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान याप्रश्नी गुरुवारपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरून 'खनिज' वाहतूक रोखून धरण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सारमानस येथे ज्या जागेत वेदांता कडून खनिज डम्प करण्यात येत आहे. ती जवळपास ८० हजार चौरस मीटर जागा ही शेतजमीन असून, त्या जागेत अतिक्रमण केले आहे असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या जमिनीच्या बदल्यात एक तर भक्कम नुकसान भरपाई मिळावी किंवा आमची शेतजमीन आम्हाला यावी, अशी पिंळगावच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या अकरा महिन्यांपासून त्यांचा संघर्षही चालू आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज शेतकरी अचानक रस्त्यावर उतरले. सुधाकर वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पिळगावची सरपंच शर्मिला वालावलकर, उज्वला बेतकीकर, चेतन सोडगिणकर आणि सुनौल वायंगणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com