Pilgao Mining Protest Dainik Gomantak
गोवा

Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

Vedanta Mining Dispute: पिळगावमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हळूहळू तापू लागले असून, आता महिलांही या आंदोलनात पुढे सरसावल्या आहेत. आज (रविवारी) ५० हून अधिक महिलांनी रस्त्यावर उतरून त्यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हळूहळू तापू लागले असून, आता महिलांही या आंदोलनात पुढे सरसावल्या आहेत. आज (रविवारी) ५० हून अधिक महिलांनी रस्त्यावर उतरून त्यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार या महिलांनी करतानाच, सरकारसह आमदारांना ''लक्ष्य'' केले. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोपही या महिलांनी केला.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे खनिज वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून, गेल्या पाच दिवसांपासून ''वेदांता''ची खनिज वाहतूक बंद आहे. नुकसान भरपाईसह आमच्या शेती आम्हांला द्या. कपात केलेल्या कामगारांच्या भवितव्याचा विचार करा. या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पुढे करूनच शेतकरी गेल्या बुधवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

आपल्या मागण्या पुढे करून शेतकरी आणि कामगार रस्त्यावर उतरले आहेत. मात्र शेतकरी आणि स्थानिक जनतेच्या भवितव्याच्यादृष्टीने सरकारला काहीच पडलेले नाही. सरकार खाण कंपनीची राखण करीत आहे.

शेतकऱ्यांची मागणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ''नारी शक्ती''ला रस्त्यावर आणण्यास सरकारच जबाबदार आहे. असा आरोप लीना सालेलकर, सुनयना हळर्णकर, अनिता सालेलकर आदी महिलांनी केला.

पंचायतीचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पिळगाव पंचायतीचा पाठिंबा आहे. आजच्या आंदोलनात पिळगाव पंचायतीची सरपंच मोहिनी जल्मी, उज्वला बेतकीकर, शर्मिला वालावलकर यांच्यासह स्वप्निल फडते, चेतन खोडगीणकर आणि उमाकांत परबगावकर पंचसदस्य सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा, असे मत पंचसदस्य शर्मिला वालावलकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

SCROLL FOR NEXT