Pig Suspicious death in fatorda goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : फातोर्ड्यात डुक्करांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने घबराट

स्थानिकांकडून आमदार विजय सरदेसाई यांना मदतीचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : दक्षिण गोव्यात सध्या नागरिकांसमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. फातोर्डात मोडसाय परिसरात अनेक डुकरांना जंतुसंसर्ग झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या भागातील अनेक डुकरे मृत्यूमुखी पडली आहेत. डुकरांच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे स्थानिकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आता लोकांनी आमदार विजय सरदेसाई यांना साकडं घातलं आहे.

मृत्यू झालेल्या डुकरांच्या शवाची चिकित्सा करुन घ्यावी असा सल्ला सोनसोडो येथील पशुसंवर्धन इस्पितळाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे जर त्यांना डुकरांना विषबाधा वगैरे झाली असेल तर कळेल आणि त्यावर उपाययोजना करता येतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
अनेक डुक्कर मृत्यूमुखी पडल्याने त्यांचे शव परिसरात पडून राहिली आहेत. त्यामुळे स्थानिकांनी आमदार विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली आहे. पशूसंवर्धन खात्यातील डॉक्टर मालरोय फेर्राव यांनी कदाचित डुकरांना जंतुसंसर्ग झाला असेल अशी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान मायणा कुडतरी येथील डुकरांना जंतूसंसर्ग झाल्याने ती मृत्यूमुखी पडली असे डॉ. फेर्राव यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना अँन्टीबायोटिक थेरपीची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या भागात डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच त्यांच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे नागरिकांनी आता थेट गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनाच साकडं घातलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT