Smart City Panaji Dainik Gomantak
गोवा

Smart Panaji: स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका, दिव्यांग व्यक्ती गाडीसह कलंडला खड्ड्यात

दिव्यांग व्यक्तीच्या गाडीवर त्याची मुलगी देखील होती.

Pramod Yadav

Smart City Panaji accident: राज्याची राजधानी पणजीत स्मार्ट सिटीचे काम जोमात सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामासाठी शहरात विविध ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. तर, अनेक ठिकाणी बोरिंग करण्यात आले आहे.

या खोदकामाचा फटका अनेक वाहन चालकांना बसला असून, पणजीत खोदकामामुळे आत्तापर्यंत सात ते आठ अपघात झाले आहेत. आज पुन्हा एक अपघात झाला असून, या दिव्यांग व्यक्ती जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरामार रस्ता आयनॉक्स थिएटरजवळ रस्त्याकडेला खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात एका दिव्यांग व्यक्तीची गाडी कलंडली. या गाडीवर व्यक्तीसोबत त्याची मुलगी देखील होती.

अपघातात दिव्यांग व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. गाडी खड्ड्यात कलंडल्यानंतर व्यक्ती आणि त्याच्या गाडीला येथे जमा झालेल्या लोकांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, या व्यक्तीने घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पणजीतील सांत इनेज परिसरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे पहिला अपघात झाला. चिरा घेऊन जाणारा ट्रक खोदकामात कलंडला होता. यात तीन ते चार कर्मचारी दुखापतग्रस्त झाले होते.

त्यानंतर शहरात अशा प्रकारच्या अपघातांची श्रुकंलाचा सुरू झाली आहे. काही दिवसांचा कलावधीनंतर वारंवार अशा घटना समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025 Final: फातोर्ड्यात रंगणार महामुकाबला! FC गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान; सलग दुसऱ्यांदा सुपर कप राखण्याची संधी

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग तिसरा विजय! जम्मू काश्मीरला पाजले पाणी; सुयश, कश्यपची मॅचविनिंग खेळी

Alphanso Mango Controversy: हापूस कोकणी की गुजराथी? वाद पेटला; 'वलसाड हापूस' GI मानांकनाची गुजरातची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोज माघार घेणार?

Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये अग्नितांडव! PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT