Philip Neri Rodrigues Dainik Gomantak
गोवा

फिलिप नेरींचा अखेर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा

नेरींनी मंत्रिपदही सोडलं, राष्ट्रवादीच्या तिकीटावर वेळ्ळीतून निवडणूक लढवणार

दैनिक गोमन्तक

पणजी : जलस्त्रोत मंत्री आणि आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांनी आपला मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. वेळ्ळीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या नेरी यांनी मंत्रिपद मिळवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेरींच्या पक्ष सोडण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता नेरी यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Philip Neri Rodrigues News Updates)

आपल्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केलेले जलस्त्रोत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स (Philip Neri Rodrigues) यांनी दिवसभरातच आपला निर्णय बदलला होता. राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय आपण आपल्या समर्थकांना विचारुन नंतरच घेणार, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले होते. यानंतर भाजपने जाहीर केलेल्या यादीत नेरींना कुठेच स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे आपली नाराजी उघड करत अखेर नेरींनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

जलस्त्रोत मंत्री व काँग्रेसचा त्याग करुन भाजपात (BJP) गेलेले वेळळी मतदारसंघाचे आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी फिलिप नेरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या राजकीय भविष्याबाबत चर्चा केली. निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना नेरींनी भाजपला रामराम ठोकला आहे. वेळ्ळीतील निवडणुकीत नेरींच्या एन्ट्रीने चुरस वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT