Philip Neri Rodrigues Dainik Gomantak
गोवा

फिलिप नेरी यांनी राजीनामा देण्याचा विचार बदलला

समर्थकांना विचारुनच अंतिम निर्णय घेणार, बाबाशानही भाजप सोडणार

दैनिक गोमन्तक

मडगाव : आपल्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केलेले जलस्त्रोत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी शेवटी दिवसभरातच आपला निर्णय बदलला आहे. राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय आपण आपल्या समर्थकांना विचारुन नंतरच घेणार, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले. (Philip Neri Rodrigues News Updates)

रॉड्रिग्स यांच्याच बरोबर काँग्रेस सोडून भाजपात (BJP) गेलेले विल्फ्रेड (बाबाशान) डीसा यांनी मात्र भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन येणारी निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी रॉड्रिग्स (Philip Neri Rodrigues) हे आपल्या पक्षाचा राजीनामा देणार आणि नंतर तृणमुल पक्षात प्रवेश करणार असे वृत्त पसरले होते. त्यानंतर रोड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता आपण राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे मात्र कोणत्या पक्षात सामील व्हायचे हा निर्णय अद्याप घेतलेला नाही असे त्यांनी सांगितले होते.

रॉड्रिग्ज यांनी सायंकाळी मात्र आपला विचार बदलत राजीनामा द्यायचा निर्णय रद्द केला. आपल्या कार्यकर्त्याना विश्वासात घेऊनच आपण काय तो अंतिम निर्णय घेईन, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नुवेचे आमदार बाबाशान डीसा याना विचारले असता, आपण आमदारकीचा राजीनामा द्यायचे ठरविले आहे. आगामी निवडणूक (Goa Assembly Elections) आपण अपक्ष म्हणून लढवावी अशी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT