Burning Tanker in Fonda Ghat Dainik Gomantak
गोवा

Fonda Ghat: फोंडा घाटात बर्निंग टँकरचा थरार, पलटी झालेल्या पेट्रोल टँकरने घेतला पेट; वाहतूक ठप्प

Burning Tanker in Fonda Ghat: गेल्या ३ ते ४ तासांपासून फोंडा घाटात वाहतूक ठप्प झाली आहे. टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Fonda Ghat, Sindhudurg

सिंधुदुर्ग: फोंडा घाटात पेट्रोल टँकर पलटी होऊन पेट घेतल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर येथून सिंधुदुर्गात येणारा पेट्रोल टँकर घाटात अचानक पलटी झाल्याने, टँकरने पेट घेतला. आगीचा मोठी भडका उघाडल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झालीय. बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमचा पेट्रल टँकर कोल्हापूर येथून सिंधुदुर्गच्या दिशेने येत असताना फोंडा घाटात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. टँकर पलटी होऊन त्याचा अपघात झाला व ज्वलनशील पेट्रोलने तात्काळ पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रुपचे धारण केले व आगीचे लोळच्या लोळ बाहेर पडू लागले.

यामुळे घाटातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. अपघात आणि आगीची घटना अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आलीय. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर टँकर बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. तोवर घाटात वाहतूक ठप्पच राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT