
Khorlim Fire Incident
म्हापसा: घाट्येश्वरनगर, खोर्ली येथील शिवा कुडणेकर यांच्या घराला आग लागून २ लाखांचे नुकसान झाले. ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास घडली. यावेळी कुडणेकर कुटूंबीय हे घर बंद करून जवळील नातेवाईकांच्या घरी हळदी समारंभाला गेलेले. दरम्यान, घराच्या पहिल्या मजल्याला आग लागली. फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घरातून धूर येत असल्याचे दिसून येताच कुडणेकर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत, दरवाजा उघडून शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही, उलट आग अधिक भडकली. पण घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
या आगीत फ्रीज, टिव्ही, कॉट व इतर घरगुती वस्तू जळून खाक झाल्याने अंदाजे २ लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जलद कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. कारण जवानांनी वेळीच घरातून गॅस सिलेंडर बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विराज फडके यांनीही घटनास्थळी भेट दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.