Pit Bull Dog Dainik Gomantak
गोवा

Goa Pet Dog Rule: गोवेकरांनो सावधान! तुम्ही कुत्रा पाळत असाल तर जाणून घ्या ही नवी मार्गदर्शक तत्वे

गोमन्तक डिजिटल टीम

Guidelines for Pet Dogs in Goa

पणजी: राज्यात काही दिवसांपूर्वी पिटबुलने लहान मुलाचा घेतलेल्या बळीनंतर पशुसंवर्धन खात्याने राज्यात कुत्रा पाळणाऱ्या मालकांसाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत. यापुढे एखादा व्यक्ती आपल्या घरात कुत्रा पाळत असेल आणि त्या कुत्र्यांमुळे मानव किंवा प्राण्यांना इजा झाल्यास किंवा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या मालकाची असेल, असे प्रतिज्ञापत्र पशुसंवर्धन खात्याला द्यावे लागणार आहे, अशी अधिसूचना पशुसंवर्धन खात्याद्वारे काढण्यात आली आहे.

जर कुत्र्यामुळे कुणाला त्रास किंवा हानी झाल्यास, तसेच मालकाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास त्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

त्यामुळे आपल्या पाळलेल्या कुत्र्यांची योग्य काळजी न घेतल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिज्ञापत्र बंधनकारक

आपल्या कुत्र्यांमुळे प्राणी किंवा मानवाला इजा पोहोचली तर त्याची संपूर्ण जबाबदारी मालकाची असेल व त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च मालकाला करावा लागणार आहे. आपण पाळत असलेल्या कुत्र्यासंबंधीची माहिती पशुसंवर्धन खात्याला देणे बंधनकारक केले आहे. कुत्र्याचे नाव, जन्म, ब्रीड, लिंग तसेच इतर माहितीसह आपण पाळत असलेल्या कुत्र्यामुळे जर कुणाला त्रास किंवा इजा झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, असे प्रतिज्ञापत्र पशुसंवर्धन खात्याला मालकाला द्यावे लागणार आहे.

जर एखादा व्यक्ती कुत्रा पाळत असेल तर त्याने सार्वजनिक ठिकाणी त्याला नेताना त्याच्या गळ्यात साखळी असणे तसेच त्याच्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कुत्र्याच्या मालकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. जर आपण पाळत असलेल्या कुत्र्याला रेबीज झाल्याचे समजल्यास तत्काळ मिशन रेबीज हॉटलाइनवर कळविणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona fishing jetty: कुटबण जेटीवरील बोटी सात दिवसांत हटवा, अन्यथा बोटी भंगारात काढणार; मत्स्योद्योग खाते

Michael Lobo: गोव्यात Traffic Police कडून पर्यटकांचा छळ सुरुच, मुख्यमंत्र्यांचा आश्वासनाचा काहीच फायदा झाला नाही; मायकल लोबोंचा सरकारला घरचा आहेर

Goa Today's News Live: गोव्यात पावसाची विश्रांती; ‘पारा’ वाढू लागला

एका म्हशीच्या मृत्यूचे गूढ उलघडेना! तळ्यात मगरींचे वास्तव्य, म्हैस बुडाल्याचा दावा गावकऱ्यांना अमान्य

Goa PWD: सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारीच असुरक्षित; खाते लोकांना काय सुरक्षा देणार? पाटकरांचा सवाल

SCROLL FOR NEXT