Goa Tourist News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पर्यटकांची सतावणूक; तीन महिलांना अटक

चंदगड प्रकरण धोकादायकच : मंत्री रोहन खंवटे

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागातून गोव्यात आलेल्या पर्यटकांची सतावणूक व मारहाण प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संबंधित ब्यूटी पार्लरमधील तीन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली होती. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष दिल्याने या विषयाला चालना मिळाली. (Persecution of tourists in Goa three women arrested)

काहींनी चंदगड येथील पर्यटकांना मारहाण करून त्यांची लुटमार केली होती. सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कोट्यवधी लोकांनी तक्रार संबंधित व्हिडीओ पाहिला. गोव्याचे नाव सर्वत्र खराब होऊ लागल्याने मंत्री खंवटे यांनी मंगळवारी म्हापसा स्थानकाला भेट देत निरीक्षकांना काही सूचना दिल्या.

तीन संशयित महिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्या सर्व नेपाळच्या रहिवासी आहेत. सदर मारहाण व लुबाडणुकीचा हा प्रकार दि. 24 मे रोजी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिरानजीक रस्त्यावर घडला होता. यापूर्वी पोलिसांनी तीन पुरुष संशयितांना अटक केली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

पर्यटकांच्या बाबतीत घडलेली ही कृती अतिशय गंभीर आहे. विद्यार्थ्यांना गोमंतकीयांकडून मिळालेली वागणूक अयोग्य आहे. हे प्रकरण गोव्याच्या पर्यटन विकासाच्या बाबतीत धोकादायक आहे.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: राज्यातील सर्व नाईट क्लबचे करणार 'ऑडिट', मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

Goa Politics: मये मतदारसंघात कार्यकर्त्यांना धमक्या, 'गोवा फॉरवर्ड'चा आरोप; सत्ताधारी भाजपवर साधले शरसंधान

Goa ZP Election: 'झेडपी'साठी आरक्षण वैध! हायकोर्टाच्या आदेशावर 'सर्वोच्च' शिक्कामोर्तब

Goa Nightclub Fire: एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! पतीसह 3 बहिणी गमावणाऱ्या भावनांसमोर मोठे संकट; जीवनाचा आधारच हरपला

SCROLL FOR NEXT