Pernem Water Issue Gomantak Digital
गोवा

Pernem Water Issue : तर पेडण्याचा पाणीप्रश्‍न सुटेल !

अभियंता सोमा नाईक ः ‘मिशन फॉर लोकल’ची अधिकाऱ्यांशी चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Water Issue : पेडणे तालुक्यात पाणी प्रश्नावर कशी उपाय योजना करता येईल, यासंबधी आज ‘मिशन फॉर लोकल’चे निमंत्रक राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंते सोमा नाईक यांना निवेदन देऊन चर्चा केली.

चांदेल येथील जलप्रकल्पाची क्षमता १५ एलएमडीने वाढविण्याचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतरच पेडणे तालुक्याची पाणी समस्या सुटेल. तुये येथे जलप्रकल्प होणार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.

या शिष्टमंडळात माजी उप नगराध्यक्ष मधुकर पालयेकर व गजानन सावळ देसाई ,पोरस्कडेचे माजी सरपंच गजानन गडेकर, सुधीर कुबडे , सुनील नाईक, गुंडू राऊळ, राकेश स्वार,गिरीश कामत, श्रीधर शेणवी देसाई , प्रदीप पटेकर यांचा समावेश होता.

अभियंते सोमा नाईक , कनिष्ठ अभियंते संदीप मोरजकर व गौरेश ठाकूर यांना राजन कोरगावकर यांनी पेडणेतील तीव्र पाणी टंचाईची माहिती देऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

कोरगाव भागात तीव्र पाणीटंचाई असून त्यासाठी पाणी सोडण्यासाठी नियोजित वेळापत्रक बनवून संबंधितांना सांगावे, जेणेकरून लोक पाण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवतील.

माजी उपनगराध्यक्ष मधुकर पालयेकर म्हणाले की,अगोदरच पाण्याचा तुटवडा असताना काहीजण पाण्याचा अपव्यय करतात, त्यांनी हे थांबवावे.

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दोन-तीन दिवस ही पाण्याची मोठी समस्या होते. चांदेल प्रकल्पात प्रक्रियेनंतर पाणी पुढे सोडण्यात येते. मात्र खंडित वीज पुरवठ्यामुळे वितरणात घोळ होत आहे, हे लोकांनी समजून घ्यावे. आपण खास जनरेटरची मागणी केली आहे. एक दीड वर्षात बैलपार जल प्रकल्प पूर्ण झाल्यावर पेडणे तालुक्यातील पाणी समस्या पूर्णपणे सुटेल.

सोमा नाईक,

सहा.अभियंता चांदेल प्रकल्प

दारूच्या भट्ट्यांसाठी मात्र नियमित पाणी असते, मग नयबाग या भागात पाणीटंचाई का होते. यासंबंधी आपण संबंधितांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, खात्याने अजूनही योग्य तो तोडगा काढलेला नाही.

- राकेश स्वार, पेडणे

पोरस्कडे भागात नळाला अनियमित पाणी येते.त्यातच मोपा विमानतळ क्षेत्रात कुपनलिका खोदल्याने बारमाही तुडुंब असलेल्या विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे लोकांचे खूप हाल होतात.

- गजानन गडेकर, पोरस्कडे माजी सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT