Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pernem News: मला टार्गेट करण्याचा प्रयत्न, पेडणे टॅक्सी आंदोलनावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा रोख कोणाकडे?

Goa Taxi Operator Protest: मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन असेच सुरु ठेवण्याची भूमिक व्यावसायिकांनी घेतली आहे.

Pramod Yadav

Pernem Taxi Operator Protest Goa

पणजी: पेडण्यात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनस्थळी जाण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नकार दिला. तसेच, त्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनीच येऊन भेट घ्यावी असे सावंत म्हणाले. शिवाय पेडण्यातील टॅक्सी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅक्सी व्यावसायिक गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पेडण्यात आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री येऊन ठोस आश्वासन देत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली. दुसऱ्या दिवशी देखील व्यावसायिक भूमिकेवर ठाम राहिले पण, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाण्यास असहमती दर्शवली.

टॅक्सी चालकांनीच येऊन भेट घ्यावी आणि मागण्या मांडाव्यात असे सावंत म्हणाले. दरम्यान, टॅक्सी चालकांचे २५ जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेणार असून, मागण्यांविषयी चर्चा करणार आहे. पण, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन असेच सुरु ठेवण्याची भूमिक व्यावसायिकांनी घेतली आहे.

आंदोलन राजकीय हेतून प्रेरित - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सी चालकांचे पेडण्यातील आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अनेकांना आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत, असेही सावंत म्हणाले.

टॅक्सीवाल्यांनी स्वत:चे Mobile App करावे

टॅक्सी व्यावसायिकांना सरकारी टॅक्सी App यायचे नसेल तर त्यांनी स्वत:चे Mobile App तयार करावे, असा पर्याय देखील सावंत यांनी यावेळी सुचवला.

काय आहेत प्रमुख मागण्या?

1) मोपा विमानतळावर जाण्यासाठी जाणाऱ्या नव्या उड्डाण पुलावरील टोल रद्द करण्यात यावा

2) हा रस्ता बांधण्यापूर्वी वापरात असलेला रस्ता टॅक्सीसाठी खुला ठेवावा.

3) विमानतळावरील प्रवाशांची बेकायदा प्रवासी वाहतूक तत्काळ बंद करावी

4) Rent A Cab व्यावसायिकांनी कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणीच व्यवसाय करण्यास भाग पाडावे.

5) App आधारीत टॅक्सी सेवेचे विमानतळावरील कक्ष बंद करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

Goa Assembly: 'काजू आधारभूत दर 200 रुपये करावा'! आमदार राणेंची सूचना; नारळ उत्पादनाकडेही वेधले लक्ष

Goa Krushighar Yojana: ‘तुम्‍ही शेतात कधी गेलात का? कृषीघरावरून युरींचा प्रश्नांचा भडीमार; रवी नाईकांनी दिले उत्तर

Goa Cricket Stadium: गोव्यात क्रिकेट सामने कधी होणार? 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या यजमानपदास वंचित

SCROLL FOR NEXT