पोप गोव्यात येणार? नोव्हेंबरपासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे Exposition, 45 दिवसांसाठी 400 कोटींचा खर्च

St. Francis Xavier Exposition: दहा वर्षातून एकदा भरणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळा जगभरातील ख्रिस्ती बांधवांसाठी अतिशय खास मानला जातो.
पोप गोव्यात येणार? नोव्हेंबरपासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे Exposition, जय्यत सोहळ्याचे सरकारचे नियोजन
St. Francis Xavier
Published on
Updated on

St. Francis Xavier Exposition

पणजी: गोव्यात येत्या नोव्हेंबरपासून गोंयचो सायब अशी ओळख असललेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष प्रदर्शनास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रदर्शन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत सरकार यासाठी जय्यत तयारी करत असल्याचे सांगितले.

पोप यांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रण दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

गोव्यात या वर्षी २१ नोव्हेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष दर्शन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील पर्यटक भेट देतील.

सरकार या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करत असून, यासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. सोहळ्यासाठी पोपना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री सावंतांनी अवशेष सोहळ्याची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. राज्य सरकार सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करणार असून, भाविकांना यावर नोंदणी करता येईल.

या सोहळ्यासाठी भाजप सरकार आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने विचार करत असल्याचे सांवत यांनी यावेळी नमूद केले.

पोप गोव्यात येणार? नोव्हेंबरपासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे Exposition, जय्यत सोहळ्याचे सरकारचे नियोजन
Margao Crime: पाकिस्तानच्या ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंचं कौतुक, मोबाईलवर स्टेटस ठेवल्यावरून मडगावात वाद

दहा वर्षातून एकदा भरणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळा जगभरातील ख्रिस्ती बांधवांसाठी अतिशय खास मानला जातो. जगभरातील ख्रिस्ती बांधव यानिमित्ताने ओल्ड गोव्यातील चर्चला भेट देऊन झेवियच्या अवशेषाचे दर्शन घेत असतात. सरकार यावेळी या सोहळ्यासाठी मोठा खर्च करत आहे.

केंद्राकडून यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते. पण, काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्र्पात यासाठी तरदूत न केल्याचे दिसून आले.

या सोहळ्यासाठी पोपनी भेट द्यावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींद्वारे पोपना केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आज पुन्हा मुख्यमंत्री सावंत यांनी या सोहळ्यासाठी पोपना आमंत्रण देण्याबाबत भाष्य केले. दरम्यान, पोप या सोहळ्यासाठी गोव्यात येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com