Mandrem panchayat  Dainik Gomantak
गोवा

Mandrem panchayat: मांद्रे पंचायतीत अविश्वास ठरावाचे प्रकरण थांबेना

मांद्रे उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल

Sumit Tambekar

राज्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक झाली अन् पेडणे तालूक्यातील मांद्रे पंचायतीत अविश्वासाचा गदारोळ झाला होता. हा गदारोळ अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कारण आता मांद्रे उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावर ही अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Pernem taluka Mandrem panchayat filed no-confidence motion against sub-sarpanch)

पेडणे तालूक्यातील मांद्रे पंचायतीत निवडीच्या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यामूळे नवनियूक्त सरपंचांना पदावरुन दुर व्हावे लागले होते. हा विषय पुन्हा सरपंच पदी अमित सावंत यांची निवड झाली अन् संपला असे वाटत होते मात्र. तो अद्याप संपलेला नाही.

अविश्वास ठरावाचा मुद्या पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरपंच बदलानंतर आता मांद्रेच्या उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. हा ठराव मांद्रे ग्रामपंचायतीच्या दोन गटातील वरिष्ठ नेत्यांनी अधिकचा हस्तक्षेप केल्याने मांडला गेला असल्याची चर्चा आहे.

गतवेळच्या ठरावात मांद्रे पंचायत सरपंच पदासाठी आमदार जित आरोलकर तसेच आमदार दयानंद सोपटे यांनी आपलं वर्चस्व राहावं यासाठी हे डावपेच रचले जात असल्याची सर्वत्र चर्चा होती. या मुद्यावरुन हा वाद वाढत असल्याची सध्या स्थानिकात चर्चा आहे. त्यामूळे सरपंचाबरोबर आता मांद्र्याचा उपसरपंच देखील बदलला जाणार का ? असा प्रश्न मांद्रे नागरिकांना पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

SCROLL FOR NEXT