खाण कामगारांच्या खुनाची गोवा खंडपीठाकडून दखल

Sand Mining: सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून राज्यात रेती उत्खनन व त्याची वाहतूक सर्रासपणे सुरु आहे.
Goa Sand Mining
Goa Sand MiningDainik Gomantak

Sand Mining: सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून राज्यात रेती उत्खनन व त्याची वाहतूक सर्रासपणे सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रेती व्यवसायातून कुडचडे येथे एका रेती उत्खनन करणाऱ्या मजुराचा खून झाला होता, ही माहिती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्‍या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर संबंधित क्षेत्रातील जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जनहित याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यानंतर ठेवण्यात आली.

द गोवा रिव्हर्स सँड प्रोटेक्टर्स (The Goa Rivers Sand Protectors) नेटवर्कतर्फे राज्यातील बेकायदा रेती उत्खननप्रकरणी व सरकारी यंत्रणेकडून कोणतीच कारवाई होत नसल्या संदर्भातची याचिका गोवा फाउंडेशनने सादर केली आहे. कुडचडे येथे रेती व्यवसायातून झालेल्या हत्येसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची तसेच रस्त्यावरून रेती वाहतूक करणारे ट्रक जात असले तरी कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे याचिकादाराने आज अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करून खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरकारी वकिलांनी त्याला उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केली.

Goa Sand Mining
Beaches in Goa : समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षारक्षकांत करणार वाढ

मागील 17 ऑगस्टला झालेल्या सुनावणीवेळी याचिकादाराने राज्यातील बेकायदा रेती उत्खनन रोखण्यासाठी किनारी भागात पोलिस गस्त असूनही काही नव्या ठिकाणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू असल्याचे तसेच काही होड्या व बोटी नदीच्या पात्रात नांगरून ठेवल्या असल्याचे वृत्त तसेच काही छायाचित्रे दिली होती.

सरकारने या दोन्ही प्रतिज्ञापत्रांसंदर्भात उत्तर द्यावे तसेच ज्या ठिकाणी हे प्रकार होत आहेत त्या ठिकाणी काय कारवाई करण्यात आली आहे त्याचा अहवाल संबंधित भागातील जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर करण्यास सांगितले आहे. कुडतरी व चांदोर या ठिकाणी पोलिस गस्त चोवीस तास असूनही रेती उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांना यासंदर्भात स्पष्टीकरण करण्याचे निर्देश खंडपीठाने द्यावे अशी विनंती याचिकादाराने मागील प्रतिज्ञापत्रात केली होती.

Goa Sand Mining
Goa Latest Update| रुमडामळच्या पंचाविरुद्ध पोलिसात तक्रार

सासष्टीमधील खोर्जुवे - कुडतरी, चांदोर, चोडण बेट (तिसवाडी), तळर्ण (पेडणे) व रिवण (बार्देश) या परिसरांचा रेती उत्खननात समावेश आहे. रिवण येथे शापोरा नदीमध्ये रेती उत्खनन केले जात असल्याने या नदीच्या किनारी राहत असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. 19 मे 2022 व 4 ऑगस्ट 2022 रोजी स्थानिकांनी तक्रारी दिल्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या नव्या ठिकाणी बेकायदा रेती उत्खनन सुरू झाले आहे. तेथे चोवीस तास पोलिस गस्तीची आवश्‍यकता आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी हे उत्खनन होत होते तेथे पोलिस गस्त सुरू असल्याने यावर नियंत्रण आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com